कोरोनामुळे मंदिरे बंद : सतेज पाटील, महादेवराव महाडिक यांच्यापुढे वेगळीच अडचण!

मतदारांना कोणाची शपथ द्यायची, हा प्रश्नच
satej Patil-mahadeorao mahadik
satej Patil-mahadeorao mahadik

राशिवडे बुद्रुक : 'तुमच्या तालुक्यात जितके ठरावधारक मतदार असतील त्यांना अलिशान गाड्यातून घेऊन थेट उटी, मैसूर' बेंगलोर करून सौंदतीच्या डोंगरावर मतदानाच्या आदल्या दिवशी यायचे आणि तिथूनच मतदानाला हजर राहायचे. ही एका नेत्याची ऑर्डर. तर दुसऱ्या पॅनल कडून तुम्ही तुमचा मेळावा दुर्गमानवाड विठ्ठलाई देवीच्या माळावर घ्या. 'एक टन मटन' घेऊन जेवणावळी उठवा. तिथेच शपथ घ्या आणि मतदानाला या, हा आदेश. आजवरचा गोकुळच्या निवडणुकीतील पायंडा यंदा कोरोनामुळे कोलमडणार आहे. जर ही देवळंच बंद झाली असतील तर आणाभाका ही निष्काम ठरणार आहेत आणि ही निवडणूक वेगळी ठरणार आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी मतदार संख्या बोटावर मोजण्या सारखी. प्रत्येक तालुक्याला मर्यादित मतदार असल्याने आजवर आपल्याला हवे तितके मतदार थेट उचलायचे आणि आठ दिवसाच्या सहलीवर पाठवायचे. जो येईल तो खर्च उमेदवार आणि तुपात बोटे असणाऱ्या नेत्यांकडून व्हायचा. यामुळे `गोकुळ`ची निवडणूक कधी येते याकडे ठराव धारकांचे लक्ष लागून राहिलेले असते. पुढे सहलीवर गेलेला मतदार आठ दिवस मौजमस्ती आणि हव्या त्या इच्छा पूर्ण करून घेतो. त्यांची ही सहल म्हणजे एक पर्वणीच ठरते. तिथून ते मतदार मतदानाच्या आदल्या दिवशी थेट सौंदत्तीच्या डोंगरावर आणले जायचे. तेथे मंदिराच्या गाभार्‍यात एकेकाला घेऊन भंडारा उचलायला लावून `मी या पॅनेलशी एकनिष्ठ राहून सर्व उमेदवारांना मतदान करेन,` अशी शपथ घेतली जायची. त्या देवीची आणि भंडाऱ्याची आज वरची समाजातील जरब अशी की ही शपथ मोडण्याचे धाडस पुढे कोणी करत नसे आणि इथेच नेत्यांचे साधायचे.

काही नेतेमंडळींनी कोल्हापूर जिल्ह्यावर जरब असलेल्या दुसर्‍या देवीच्या माळावर म्हणजे दुर्गमानवाड विठ्ठलाई च्या माळावर मेळावे घेऊन टनाने मटण आणून रस्सा भात वाढण्याच्या प्रथा सुरू केल्या. इथेही देवीच्या नावाची भीती घालून संबंधित मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयोग वर्षानुवर्षे सुरू होता.

मात्र यंदाची निवडणूक या सगळ्याला पुरून उरणारी ठरत आहे. कारण या पद्धतीपेक्षाही कोरोनाच या निवडणुकीचा कर्दनकाळ ठरू लागला आहे. देवींच्या शपथांपेक्षा कोरोनाची भीती मतदारांवर एवढी गारुड घालुन आहे की मतदार आपले घर' आपला संसार सोडून बाहेर पडण्याची तसदी घेताना दिसत नाही. जे काय सहलीवर गेले असतील किंवा जाणार असतील त्याबाबतचा उद्देश सफल होण्याची चिन्हे नाहीत. कारण कोरोणाच्या महामारीमुळे जर देऊळ बंद असेल, तिथे पोलिसांचा पहारा असेल तर भंडारा आणि अंगारा उचलणार कोण आणि देणार कोण हा प्रश्न आहे. शपथा आणाभाका झाल्याच तरी त्यात गांभीर्य असणार नाही. कारण जी शपथ देवीच्या गाभाऱ्यात, देवीच्या आसपास होते ती मोडण्याचे धाडस आजवर कोणी केले नाही. मात्र देऊळ बंद असलेल्या देवी पासून दूर होणाऱ्या शपथा फारशा उपयोगाच्या ठरणार नाहीत हेही तितकेच खरे.

ही पण बातमी वाचा : गोकुळ निवडणुकीबाबत शासन म्हणणे मांडणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणूक घ्यावी की नको याबाबत शासनाकडून उद्या म्हणने मांडले जाणार आहे. गोकुळ व काही दूध संस्थांनी कोरोनामुळे गोकुळची निवडणूक रद्द करावी अशी मागणी केली होती. यावर न्यायालयाने शासनाकडे म्हणने मांगितले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक ठरावदारांचे कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. काहींना उपचार सुरु आहेत. अशामध्ये राज्यात इतर सहकारी संस्थांची निवडणूक रद्द झाली असताना गोकुळच्या निवडणूकीसाठी हट्टाहास कशासाठी अशी याचिका सत्तारुढ व काही दूध संस्थांनी उच्च न्यायालयात केली आहे. यावर उच्च न्यायालयाने राज्य शासनाने म्हणने मागितले आहे. यावर उद्या हे म्हणून दिले जाणार आहे. यावरच निवडणूक होणार किंवा नाही, हा फैसालही होवू शकतो. गोकुळसाठी 2 मे ला मतदान होत आहे. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधी पॅनेलकडून जोरदार प्रचार सुरु झाला आहे. ठरावदारांचे मेळावेही घेतले जात आहेत. अशामध्ये निवडणूक योग्य आहे. का असाही सवाल याचिकाकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, उद्या या याचिकेवर सरकारचे म्हणने मांडले जाईल. त्यानंतर यावर निर्णय घेतला जावू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com