राज्य कृती शाळा समितीत फूट; कार्याध्यक्षांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा - State School Committee extends support to Mahavikas Aghadi Candidate | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य कृती शाळा समितीत फूट; कार्याध्यक्षांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा

भारत नागणे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत संस्थापक  अध्यक्ष असलेल्या राज्य  कृती शाळा  समितीमध्ये उभी फूट पडली आहे. कृती समिती चे राज्याचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील (कोल्हापूर) यांनी  काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

पंढरपूर : शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत संस्थापक  अध्यक्ष असलेल्या राज्य  कृती शाळा  समितीमध्ये उभी फूट पडली आहे. कृती समिती चे राज्याचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील (कोल्हापूर) यांनी  काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

श्री. पाटील हे ऐन निवडणूकीच्या तोंडावर कृती समितीमधून बाहेर पडल्याने कृती समितीचे उमेदवार आणि विद्यमान शिक्षक  आमदार दत्तात्रय  सावंत यांना मोठा धक्का बसल्याने मानले जाते. कृती समितीचे अन्य पदाधिकारी देखील लवकरच बाहेर पडून महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याची माहितीही श्री.पाटील यांनी दिली. २०१४  साली झालेल्या निवडणुकीत आमदार सावंत यांना सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विजयामध्ये कृती समितीचा मोठा वाटा होता. दरम्यान सहा वर्षांमध्ये कृती समितीमध्ये नाराजी वाढल्याचे दिसून आले. त्या नाराजीतून श्री. पाटील यांनी आमदार सावंतांच्या विरोधात बंड पुकारले आहे.

मागील सहा वर्षामध्ये पुणे शिक्षक मतदार संघात अनेक राजकीय संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे या  निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजप नेत्यांनी आपली  प्रतिष्ठा पणाला लावली  आहे. पुणे शिक्षक मतदार संघातून काँग्रेसने जयंत आसगावकर यांना तर पदवीधर मधून राष्ट्रवादीने अरूण लाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पदवीधर मधून संग्राम देशमुख यांना तर  शिक्षक मतदार संघातून जितेंद्र पवार यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे.

या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाने लक्ष घातल्याने निवडणूकीतील चुरस आणखी वाढली आहे. अशातच आमदार सावंत यांच्याच कृती समितीमध्ये फूट पडल्याने श्री. सावंतांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार आसगावकर यांच्या विजयासाठी गृहराज्य मंत्री सतेज पाटील,ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण,माजी केंद्रीय गृह मंत्री सुशील कुमार शिंदे  यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

तर दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागा घेचून घेण्यासाठी भाजपने ही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केले आहे. दरम्यान कृती समितीचा  भक्कम असलेल्या पाठिंब्यात ही या निमित्ताने दुही निर्माण झाली आहे.फुटी नंतर आमदार सावंत कशा पध्दतीने आपला राजकीय डाव टाकतात याकडेच शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे.

मागील सहा वर्षापूर्वी कृती समिती म्हणून आमदार सावंत यांना निवडून दिले. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले एकही वचन त्यांनी पूर्ण केले नाही. शिक्षकांचा त्यांनी विश्वास घातच केला. एकावेळी एका जिल्ह्यातील कार्यकर्त्यांला संधी देण्याचे ठरलेले होते. पण त्यांनी तोही शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के आम्ही विजयी करू- बाबासाहेब पाटील,राज्य कृती शाळा  समिती कार्याध्यक्ष,कोल्हापूर

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख