शेतकऱ्यांचा संयम सुटतोय; राजू शेट्टींचा इशारा - Raju Shetty Warns Modi Government over Farmers Agitation | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांचा संयम सुटतोय; राजू शेट्टींचा इशारा

सुनील पाटील
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

 गेली तेरा दिवस दिल्लीत कुडकुडणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम सुटत चाललेला आहे.  मोदी सरकारने याचा विचार करावा, अन्यथा देशात काहीही घडू शकते असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. 

कोल्हापूर  :  गेली तेरा दिवस दिल्लीत कुडकुडणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम सुटत चाललेला आहे.  मोदी सरकारने याचा विचार करावा, अन्यथा देशात काहीही घडू शकते असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. 

केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी  आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशेहून अधिक पक्ष व संघटनांनी सहभाग नोंदवला. बिंदू चौक येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी व कार्यकर्ते आहेत. शहरातून मोठ्या प्रमाणात पाणी काढून बंदचे आवाहन करण्यात आले त्याला लोकांनी व दुकानदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ते बोलत होते. 

श्री शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार उद्या कृषी विधेयकाबाबत बैठक घेत आहेत.  या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूचा विचार करावा. शेतकऱ्यांचे क्ष कोणीही प्रतिष्ठित नाही याचा विचार करावा देशातील शेतकरी अशांत आहे. गेली तेरा दिवस दिल्लीत आंदोलन सुरू आहे त्या शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका शेतकऱ्यांच्या म्हणण्याचा व विचारांचा विचार करावा असा इशाराही श्री शेट्टी यांनी आज दिला.

दरम्यान शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या विधेयकाचा निषेध करीत विधेयकांच्या प्रतींची होळी केली. हे विधयक शासनाने तातडीने मागे घ्यावे अशी विनंती श्री शेट्टी यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी सर्वांनी एकजूट होवून निषेध नोंदविल्याबद्दल श्री शेट्टी यांनी आंदोलनात सहभागी घटकांचे अभिनंदन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर बाजार समिती, गूळ, भाजीपाला मार्केट, राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, सराफ बाजारही बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. त्याशिवाय जिल्ह्यातून विविध संघटना, पक्ष, संघ, व्यापारी, उद्योजक पाठबळ देत आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख