पंकजा मुंडे नाराजी व्यक्त करतील; पण बंड करणार नाहीत : चंद्रकांत पाटील

त्यामुळे कोणावर तरी अन्याय होणार, हे स्वाभाविकच आहे.
Pankaja Munde will express displeasure; But they will not revolt : Chandrakant Patil
Pankaja Munde will express displeasure; But they will not revolt : Chandrakant Patil

कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळात ४० नवीन मंत्री झाले आहेत. देशातील लोकप्रतिनिधींची संख्या, प्रादेशिक आणि जातीय प्रतिनिधित्व या सर्वांचा विचार करता प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीला मंत्रिपद मिळतेच, असे नाही. त्यामुळे कोणावर तरी अन्याय होणार, हे स्वाभाविकच आहे. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज होणे सहाजिक आहे. त्यातून त्यांनी राजीनामे देऊन आपली नाराजी व्यक्त केली असावी. पंकजा मुंडे आपली नाराजी व्यक्त करतील; पण कधीही बंड करणार नाहीत, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. (Pankaja Munde will express displeasure; But they will not revolt : Chandrakant Patil)

कोरोना महामारीच्या काळात सामाजिक काम करणाऱ्या संस्थांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 

पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला संघर्ष करायला शिकवणारे गोपीनाथ मुंडे यांच्या पंकजा मुंडे ह्या कन्या आहेत. त्यांच्याकडे समजूतदारपणा आहे; म्हणूनच त्यांनी नाराज कार्यकर्यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त केले. पक्ष हे आपले घर आहे. आपण आपल्या घरातून का बाहेर पडायचे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे यांना लाभला आहे. कार्यालयातील भाजप गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षासाठी रस्त्यावर आणला, त्यामुळे पंकजा मुंडे आपली नाराजी व्यक्त करतील; पण कधीही बंड करणार नाहीत. राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी समजावून सांगितले. यातूनच त्यांचा समजूतदारपणा दिसून येतो.’

देवस्थान जमिनीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘देवस्थान समितीच्या जमिनीचे रजिस्टर १८८५ मध्ये ब्रिटीशांनी केले. त्यामध्ये देवस्थान जमिनीच्या नोंदी आहेत. त्यानंतर असा नियम करण्यात आला आहे की, या जमिनी त्या रजिस्टरमधून बाहेर काढाव्यात. मुळात ज्या देवस्थान जमिनीच्या भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर होतो. त्याची या रजिस्टरमध्ये नोंदच नाही.

ही जमीन १९५५ पासून एका व्यक्तीच्या नावावर आहे. नंतर त्या व्यक्तीने या जमिनीचा ट्रस्ट केला असेल. धर्मादाय आयुक्तांनी १९९७ मध्ये ही जागा विकण्याची परवानगी दिली. त्यानंतर २००८ मध्ये देवस्थानकडून काढून ती क्लास वन करायला परवानगी दिली. दोन्ही वेळा मी सरकारमध्ये नव्हतो. त्यानंतर या जमिनीचा नजराणा किती घ्यायचा, याचा वाद सुरू झाला. त्यामुळे ही फाईल मी पुनर्विचारासाठी पाठवली. त्यामुळे यात भ्रष्टाचार करण्याचा प्रश्नच कुठे आला? हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे’
 
या सरकारचा जनतेला वीट आलाय

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या परस्परविरोधी विधानाबद्दल आमदार पाटील म्हणाले की, ‘‘आधी टीका करायची आणि मग सावरून घ्यायचे, असा खेळ सरकारमधील मंत्र्यांनी सुरू केला आहे. हे न कळण्याइतपत जनता वेडी नाही. जनतेला या सरकारचा वीट आला आहे. निवडणुकीत जनता महाविकास आडीचा हिशेब करेल.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com