आमदार प्रकाश आवाडे यांची लवकरच कॉंग्रेसमध्ये घरवापसी? 

आमदार प्रकाश आवाडे यांनी महाराष्ट्राचे कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेतल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.
MLA Prakash Awade to re-enter Congress soon?
MLA Prakash Awade to re-enter Congress soon?

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडलेले इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी महाराष्ट्राचे कॉंग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेतल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे निष्ठावंत म्हणून आवडे घराण्याची ओळख आहे. पण, विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आवाडे यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देत इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत आवाडे विजयी झाले आहेत. 

दरम्यान, निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे त्यांनीही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला. मात्र, राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली, त्यामुळे आवडे यांना विरोधी पक्षाच्या गटात बसावे लागले. 

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा आज (ता. 21 नोव्हेंबर) कोल्हापुरात झाला. त्या वेळी भाषण संपताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये पुन्हा यावे, अशी जाहीर ऑफर दिली. यामुळे आमदार आवडे पुन्हा कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत काय? याबाबतची चर्चा सुरू झाली. 

दरम्यान, याबाबतची माहिती घेतली असता आमदार आवाडे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे प्रभारी आणि कर्नाटक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांची भेट घेतल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यांची ही भेट मेळाव्यात चर्चेचा विषय ठरली होती, त्यामुळे आवाडे पुन्हा एकदा घरवापसी करण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

आमदार आवाडे हे मूळचे कॉंग्रेसचेच आहेत. त्यांना कोणत्याही कारणास्तव पदावरून किंवा पक्षातून काढलेले नाही. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये येऊ शकतात. ते पुन्हा कॉंग्रेस मध्ये येणार आहे काय? भेटीचा विषय काय होता, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com