पंढरपूर-विजयपूर रेल्वे प्रश्नावर दानवे यांना आमदार आवताडे यांचे निवेदन

या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागल्यास पंढरपूर-लोणंद रेल्वेच्या माध्यमातून कर्नाटकातील प्रवाशी व मालवाहतूक उत्तर भारतात जाण्यासाठी सोलापूरमार्गे वाढणारे असून अंतर, खर्च व वेळेची बचत होणार आहे.
Samadhan Autade.jpg
Samadhan Autade.jpg

मंगळवेढा : कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर या रेल्वेमार्गासाठी आमदार समाधान आवताडे यांनी प्रयत्न सुरू केला आहेत. याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटून त्यांनी निवेदन दिले. या वेळी त्यांच्या समवेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते. या वेळी सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या नवीन मार्गाबाबत देखील मागणी करण्यात आली. (MLA Avtade's statement to Danve on Dharpur-Vijaypur railway issue)

पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रबरोबर सर्वाधिक भाविक कर्नाटकातून चालत येतात. परंतु, त्यांचा परतीचा प्रवास सुखकारक होत नाही. तो प्रवास प्रवास सुखकर व्हावा, या दृष्टीने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर-विजयपूर हा 108 किमीचा रेल्वेमार्ग 2014-15 मध्ये मंजूर करून घेतला. त्यासाठी 1294 कोटी खर्च अपेक्षित होता. परंतु, या मार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने यासाठी निधी दिला नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप रेंगाळलेल्या अवस्थेत आहे.

या रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लागल्यास पंढरपूर-लोणंद रेल्वेच्या माध्यमातून कर्नाटकातील प्रवाशी व मालवाहतूक उत्तर भारतात जाण्यासाठी सोलापूरमार्गे वाढणारे असून अंतर, खर्च व वेळेची बचत होणार आहे. शिवाय पंढरपूर-मंगळवेढा या परिसरातील द्राक्षे, डाळिंब, ज्वारी, साखर व इतर शेतमाल दक्षिण व उत्तर भारतामध्ये पाठवणे शक्‍य होणार आहे. विजयपूर-पुणे हे अंतर 374 किलोमीटर आहे व 314 किलोमीटर पंढरपूरमार्गे होताना. यामुळे 60 किमी बचत होणार आहे. स्व. भारत भालके यांनी देखील रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र हा प्रश्न मार्गी लागला नव्हता. आता पुन्हा आमदार आवताडे यांच्या भेटीने हा प्रश्न मार्गी लावण्याची अशा निर्माण झाली आहे.

आवताडेंची दिल्ली दरबारी धाव

नुकत्याच झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकाल भाजपचे आमदार समाधान आवताडे विजयी झाले. या मतदारसंघातील खासदार व आमदार एकाच पक्षाचे झाल्यामुळे या प्रलंबित रेल्वे प्रश्नाला गती मिळण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची दखल घेत आमदार आवताडेंनी दिल्ली दरबारी धाव घेतली आणि हा प्रश्न सोडवण्याबाबत निवेदन दिले. त्यामुळे हा प्रश्नाला भविष्यात सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com