विरोधकांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत राहावं : शंभुराज देसाई (व्हिडिओ) - Let opposition day dream about forming the government say Shambhuraj Desai | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधकांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत राहावं : शंभुराज देसाई (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

विरोधकांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत राहावं, कोरोना संसर्ग संपला की सरकारच्या कामाची गती दाखवणार, असे म्हणत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना फैलावर घेतलं.

सातारा : विरोधकांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत राहावं, कोरोना संसर्ग संपला की सरकारच्या कामाची गती दाखवणार, असे म्हणत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना फैलावर घेतलं. राज्यातील महाविकास आघाडी चे सरकार पाच वर्षे टिकणार नाही असे विरोधकांकडून वेळोवेळी सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली.

“या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे आहे.राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष भक्कमपणानं या सरकारमध्ये सामील झालेले आहेत. शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेत्याचं मार्गदर्शन या सरकारला आहे. पूर्वी मुंगेरीलाल के हसीन सपने नावाची मालिका आपण पाहायचो, त्याप्रमाणेच विरोधकांनीही स्वप्न पाहत राहावं.” असं शंभूराज देसाई म्हणाले. 

सरकार लवकरच पडणार असं विरोधकांकडून सांगितलं जातं याविषयी विचारले असता, ते म्हणाले, "हे सरकार भक्कमपणे काम करत राहणार आहे.  एका भक्कम विचारावर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. या सरकारला शिवसेनेचं नेतृत्व आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष भक्कमपणांन या सरकारमध्ये सामील आहेत. शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांचं सरकारला मार्गदर्शन आहे. पूर्वी मुंगेरीलाल के हसीन सपने नावाची मालिका वाहिनीवर पाहिली जायची त्यापमाणे विरोधकांनी स्वप्न पाहत राहावं,''

''कोरोना संसर्ग नसता, तर हे सरकार किती वेगाने काम करतं, दिलेली आश्वासनं, वचन याला आम्ही कसे बांधील आहोत हे दाखवून दिलं असंत. पण कोरोनामुळे आर्थिक मर्यादा आल्या आहेत. तसेच, कोरोनामुळे राज्याचं नियोजन बिघडलं, आम्हाला आर्थिक मर्यादा आल्या, सगळी गणितं विस्कटली. पण आम्ही डगमगलो नाही. आर्थिक घडी व्यवस्थित झाली की आम्ही आमचे काम दाखवून देऊ,''असा दावाही त्यांनी यावेळी केला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख