सतेज पाटील यांना कोरोनाची लागण - Kolhapur Guardian Minister Satej Patil Tested Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी काही वेळापूर्वी स्वतःच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. आपली प्रकृत्ती उत्तम असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे.

कोल्हापूर : गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी काही वेळापूर्वी स्वतःच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. आपली प्रकृत्ती उत्तम असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. 

माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन, असे सजेत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः देशमुख यांनी शुक्रवारी ट्वीट करून दिली. दरम्यान, कोरोनावर मात करून मी पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल, असा विश्‍वासही देशमुख यांनी ट्‌विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. 

ट्‌विटमध्ये देशमुख यांनी म्हटले आहे, "माझी कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मी करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.'' 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख