परमबीर सिंह भाजपचे डार्लिंग....

सध्या सर्वत्र चर्चेत असलेले आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग झाले आहेत. त्यांना माफीचा साक्षीदार करण्याचा संशय आपण यापुर्वीच व्यक्‍त केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
Parambir Singh - Hassan Mushriff
Parambir Singh - Hassan Mushriff

कोल्हापूर : सध्या सर्वत्र चर्चेत असलेले आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) हे भाजपचे डार्लिंग झाले आहेत. त्यांना माफीचा साक्षीदार करण्याचा संशय आपण यापुर्वीच व्यक्‍त केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushriff) यांनी केले. तसेच अंबानींच्या (Mukesh Ambani) बंगल्याबाहेर ठेवण्यात आलेल्या जिलेटिन कांड्याचे जे प्रकरण आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही मुश्रीफ यांनी यावेळी केली. Hassan Mushriff says Parambir Singh is BJPs darling

जिल्हा बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप मिडीया सेलचे प्रमुख नवीनकुमार जिंदल यांनी पवार (Sharad Pawar) साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर चुकीचे आरोप केले आहेत. पवार यांच्या आजारपणाचा व वाझे (Sachin Waze) प्रकरणाचा संबंध जोडून जी काही वक्‍तव्ये केली आहेत याचा मी निषेध करतो. तसेच भारतीय जनता पक्षाने (BJP) जर दोन-तीन दिवसात याप्रकरणी दिलगिरी व्यक्‍त केली नाहीतर अशाच प्रकारची वक्‍तव्ये राष्ट्रवादीकडून केली जातील. भाजपला याप्रकरणी मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. 

मुश्रीफ म्हणाले, शरद पवार आजारी पडल्यानंतर त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnathsinh), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) आदी नेत्यांनीही विचारपूस केली होती. मात्र जिंदाल यांच्या वक्‍तव्यावर कोणीही दिलगिरी व्यक्‍त केलेली नाही. मोदी, शहा हे पश्‍चिम बंगालमध्ये (West Bengal Elections) तृणमूल कॉंग्रेसच्या मागे लागल्याने ते व्यस्त असल्याचे आपण समजू शकतो. मात्र फडणवीस हे विविध विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देतात. त्यांनी या विषयावर बोलणे आवश्‍यक होते मात्र त्यांनीही हा विषय गांभीर्यान घेतलेला नाही. त्यामुळे दोन दिवसात फडणवीस यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्‍त करावी,अशी मागणी .मुश्रीफ यांनी केली.  Hassan Mushriff says Parambir Singh is BJPs darling

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  सतत पत्रकार परिषदा घेतात. मग या विषयावर त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? त्यांनी ताबडतोब यावर प्रतिक्रिया द्यावी, अन्यथा त्यांना या सर्वाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही.मुश्रीफ यांनी यावेळी दिला. यावेळी मुश्रीफ यांनी जिंदाल यांच्यावरही जोरदार टिका केली. कोण हा जिंदाल? पवार साहेबांवर बोलताना त्याला लाज वाटत नाही का? भाजपचा हा सर्व प्रकार ठरवून सुरु असल्याची टीकाही मुश्रीफ यांनी यावेळी केली. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com