काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय - गोपीचंद पडळकर - Gopichand Padalkar Criticize Congress NCP Leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय - गोपीचंद पडळकर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

पदवीधर निवडणूक ही या सरकारच्या टग्यांच्या विरोधात आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय आहे, अशी बोचरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केले. सांगली मध्ये पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. 

सांगली :  पदवीधर निवडणूक ही या सरकारच्या टग्यांच्या विरोधात आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय आहे, अशी बोचरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केली. सांगली मध्ये पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचे समर्थन पडळकर यांनी यावेळी केले. '' तुम्ही आमच्या नेत्यांवर टिका करता मग आमच्या नेत्यांनी टिका केली तर कुठे बिघडले? आणि ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता. मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं? तुम्ही मोदिंच्यावर टीका करतात, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर मग इतका त्रागा का करता? असा सवाल पडळकर यांनी केला. ही निवडणुक भ्रष्टाचाराच्या  विरोधातील आणि प्रखर जातीयवाद्यांच्या विरोधातील निवडणूक आहे, असेही ते म्हणाले. बिहार निवडणुकीत सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते म्हणाले मोदींच्या नेतृत्व लोकांनी नाकारले. नंतरच्या निकाल नंतर म्हणू लागले आम्हाला आत्मचिंतन करावे लागेल. पण या दोघांना दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवयलागली आहे, अशीही टीका पडळकर यांनी केली. 

आंदोलने केल्याशिवाय जनतेच्या प्रश्नांवर सरकारकडून न्याय मिळत नाही, अशी अवस्था असताना, जाणते राजे काय झोपा काढताहेत का? त्यांना सरकारला चिमटा घेता येत नाही का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला होता. “राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एका मेळाव्यात केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाटील यांना लक्ष्य करत आहेत. पडळकर यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याची मात्र पाठराखण केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख