ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण 

ठाकरे सरकारमधील ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनाही आजच कोरोनाची लागण झाली आहे. एकाच दिवसांत दोन मंत्र्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
Corona to Rural Development Minister Hassan Mushrif
Corona to Rural Development Minister Hassan Mushrif

मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज (ता. 18 सप्टेंबर) पॉझिटीव्ह आला आहे. मुश्रीफ यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

ठाकरे सरकारमधील ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनाही आजच कोरोनाची लागण झाली आहे. एकाच दिवसांत दोन मंत्र्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

मुश्रीफ यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून कोरोनावर मात करून लवकरच आपल्या सेवेत दाखल होईन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

राज्याच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. हे सर्व मंत्री सध्या राज्यात काम करीत आहेत. 

हेही वाचा : उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोना 

मुंबई : राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी ट्‌वीट करुन ही माहिती दिली आहे. लक्षणे नसल्याने तुर्तास त्यांना घरातच विलिगीकरणात ठेवण्यात आले असून, कदाचित आज सायंकाळपर्यंत रुग्णालयात दाखल होण्याची शक्‍यता असल्याचे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्रीत अनेक आमदार व काही मंत्री आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गडकरी हे सोमवारी (ता. 14) संसद अधिवेशनाला काही काळ उपस्थित होते आणि पहिल्याच रांगेत बसले होते. यामुळे आरोग्य यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. 

दरम्यान, राज्यात काल 24 हजार 619 कोरोनाबाधितांची भर पडली असून, बाधितांचा एकूण आकडा 11,45,840 वर पोचला आहे. दुसऱ्या दिवशीही दिवसभरात तब्बल 468 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 30,409 वर पोचला आहे. दिवसभरात 19,522 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

काल नोंद झालेल्या 468 मृत्यूंपैकी 286 मृत्यू मागील 48 तासांतील तर 77 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आज एकूण 3,01,752 सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज 19,522 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत 8,12,354 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.90 टक्के आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com