..तुमचं तर मंत्रीपदही काढून घेतलं : केसरकरांना राजन तेलींचा टोला - BJP Leader Rajan Teli Answers Kesarkar criticism on Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

..तुमचं तर मंत्रीपदही काढून घेतलं : केसरकरांना राजन तेलींचा टोला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

नारायण राणे यांची कुवत होती म्हणून शिवसेना प्रमुख  स्व. बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री बनवले. तुमचं तर राज्यमंत्री शिवसेनेने काढून घेतले, असे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांना लगावला. 

सिंधुदुर्ग : नारायण राणे यांची कुवत होती म्हणून शिवसेना प्रमुख  स्व. बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री बनवले. तुमचं तर राज्यमंत्री शिवसेनेने काढून घेतले, असे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांना लगावला. 

केसरकर यांनी खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर टीका केली होती. त्याला राजन तेली यांनी उत्तर दिले. " नारायण राणे यांची मुख्यमंत्री व्हायची कुवत होती म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा महसूलमंत्री  केलं आणि त्यांनतर मुख्यमंत्री केलं.  त्यांच्यात कुवत होती म्हणून त्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं. तुमच्याकडे राज्यमंत्री पद होते तेही काढले. विश्वास हा शब्द तुम्हाला लागू होत नाही. खरे शिवसेना कोकणात वाढली.  त्यावेळी आम्ही लोक होतो. तुम्ही यायत्या बिळावर आलेले आहात त्यामुळे तुम्हाला शिवसेना काय हे कधीच कळणार नाही,'' असा टोला तेली यांनी केसरकर यांना उद्देशून लगावला. 

नारायण राणे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केलेली टीका पहिलीच्या पुस्तकातील  उंदराच्या 'ढुम-ढुम-ढुमाक" या गोष्टीसारखी आहे. राजाने टोपी घेतली, तर राजा भिकारी आणि टोपी दिली तर राजा मला भ्याला,असे बोलण्यासारखे आहे. असा चिमटा केसरकर यांनी राणे यांना उद्देशून काढला होता. 

अशा प्रवृत्तीच्या विरोधात मी आजही तितक्याच तिडकीने लढा देईन,कोकणासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे, असेही केसरकर म्हणाले होते.  ''सिंधुदुर्गातील काही नेते जीडीपी बद्दल बोलतात.पण त्यानी जीडीपीचा फुल फाॅर्म माहिती तरी आहे का? ज्याची साधी एका कार्यालयात काम करण्याची लायकी नाही, अशांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात. त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का?'' असे केसरकर म्हणाले होते.  
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख