दोन मोहित्यांपुढे पृथ्वीराज चव्हाणांनी टेकले हात!

त्याची कल्पना संबंधितांना दिली आहे.
Avinash Mohite and Dr. Indrajith Mohite's integration efforts stopped: Prithviraj Chavan
Avinash Mohite and Dr. Indrajith Mohite's integration efforts stopped: Prithviraj Chavan

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यावे, यासाठी गेली दोन महिन्यांपासून आम्ही प्रयत्न केले. मात्र, त्या प्रयत्नांना यश आलेले नाही. रविवारी (ता. ६ जून) रात्री अखेरची बैठक झाली; परंतू त्यातही यश न आल्याने एकत्रीकरणाच्या चर्चेतून मी बाहेर पडलो आहे, त्याची कल्पना संबंधितांना दिली आहे, असे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले. (Avinash Mohite and Dr. Indrajith Mohite's integration efforts stopped: Prithviraj Chavan) 

सातारा व सांगली जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीत अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या गटाच्या एकत्रिकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्य मंत्री विश्वजीत कदम, अॅड. उदय पाटील-उंडाळकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. कॉँग्रेसकडून अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रिकरणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आज त्या प्रक्रियेतून माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

आपण बाहेर पडल्याने एकत्रिकरण फिसकटले असे म्हणता येईल का, त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, एकत्रिकरणाचे प्रयत्न माझ्या परिने थांबवले आहेत. त्यामुळे एकत्रिकरण फिसकटले, असे कसे म्हणता येईल. दोन महिन्यांपासून कृष्णा कारखाना निवडणुकीत दोन्ही मोहिते गटात आघाडी व्हावी; म्हणून प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. सभासद आता निर्णय घेतील. आजपासून चर्चेत सहभागी होणार नाही, ही माझी भूमिका आहे. अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांनाही त्याची कल्पना दिली आहे.

आपल्या गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता आपण कोणती भूमिका घेणार, या प्रश्नावर ते म्हणाले. यावर आत्ताच काही भाष्य करणार नाही. सभासद योग्य तो निर्णय घेतील. आपण चर्चेतून बाहेर पडला म्हणेज आघाडी होणार नाही, असे म्हणावे का, त्या प्रश्नावरही आघाडी होणार नाही, असे मी सांगू शकत नाही. संबंधित त्याचा निर्णय घेऊ शकतात, याचा आमदार चव्हाण पुनरूच्चार केला. 

एकत्रिकरणाच्या चर्चेत आजपासून मी नसणार 

कृष्णा कारखान्यात कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार, त्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ही निवडणूक आर्थिक संस्था, सहकारी संस्थेची निवडणूक आहे. त्यामुळे त्याचा निर्णय त्या त्या पातळीवर होईलही. मात्र समविचारी लोकांनी एकत्र यावे, यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात अपेक्षित यश न आल्याने आजच्या तारखेपासून त्या विषयात मी सहभागी होणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com