बुलडाण्यात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी केली दुधाने आंघोळ

दुधाचा दर हा पाण्याच्या बाटली पेक्षा कमी झाल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे दुधाला पाच रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी बुलडाण्यात शेतकऱ्यांनी आज (ता. २१ जुलै २०२० ) चक्क अंगावर दूध ओतून घेतले.
Swabhimani Sanghatana Milk Agitaion at Buldana
Swabhimani Sanghatana Milk Agitaion at Buldana

बुलडाणा : दुधाचा दर हा पाण्याच्या बाटली पेक्षा कमी झाल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे दुधाला पाच रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी बुलडाण्यात शेतकऱ्यांनी आज (ता. २१ जुलै २०२० ) चक्क अंगावर दूध ओतून घेतले. स्वतः 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुधाने अंघोळ करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. 'स्वाभिमानी'चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज राज्यभर दूधबंद आंदोलनाची हाक दिली आहे.

यावेळी गायीच्या दुधासाठी पुढील ३ महिन्यांसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करावे..... केंद्र सरकारने २३ जूनला १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा..... केंद्र सरकारने ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा....निर्यात अनुदान प्रतिकिलो ३० रुपये देण्यात यावे... व दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा....या मागण्या यावेळी करण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी हातात दुधाच्या कॅन घेउन रस्त्यावर उतरून प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर चक्क दुधाने आघोंळी केल्या. या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर हिंदू स्मशानभूमी झोपडपट्टीतील गरिबांना दूध वाटप करण्यात आले. 

या आंदोलनात राणा चंदन, शे.रफिक शे.करीम,आकाश माळोदे, दत्ता जेऊघाले,अ मोल मोरे, निलेश राजपूत, गोपाल जोशी, हरी उंबरहंडे, अमोल बाहेकर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी व 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com