सातबारा उतारा कोरा केला का.. अजित पवारांना तुपकरांचा सवाल..

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर आता वारांची अवलाद सांगणार नाही असं विधान अजित पवार यांनी अनेकसभांमधून केलेमात्र अद्यापही शेतकर्‍यांच्या सातबारावर बोजा उतरलेला नाही आता अजित दादा तुम्हीच सांगा काय करायचं? असा सवाल तुपकर यांनी विचारला आहे.
Ajit Pawar - Ravikant Tupkar
Ajit Pawar - Ravikant Tupkar

पंढरपूर : महाविकास आघाडीचे काम करायचं हे काय आम्ही उक्तं  घेतलेलं नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर पवारांची (Ajit Pawar) अवलाद सांगणार नाही  असे सांगणारे अजित दादा तुम्हीच सांगा सातबारा कोरा झाला आहे का?  असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी उपस्थित केला आहे. Swabhimani Leader Ravikant Tupkar Challenges Ajit Pawar

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) घणाघाती टीका केलेली आहे. ''शेतकऱ्यांच्या आणि सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही महाविकास आघाडी सोबत गेलो आहे. मात्र शेतकऱ्यांच्या ऊसाची (Sugarcane) रक्कम थकीत  आहे. विज (Electricity) बिल जमा केले नाही म्हणून गोरगरिबांची वीज कट केली जात आहे, असे तुपकर म्हणाले.

शेतकऱ्यांचा (Farmers) सातबारा कोरा झाला नाही तर आता पवारांची अवलाद सांगणार नाही असं विधान अजित पवार यांनी अनेक सभांमधून केले मात्र अद्यापही शेतकर्‍यांच्या सातबारावर बोजा उतरलेला नाही आता अजित दादा तुम्हीच सांगा काय करायचं? असा सवाल तुपकर यांनी विचारला आहे. Swabhimani Leader Ravikant Tupkar Challenges Ajit Pawar

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची भूमिका मान्य नसल्याने पंढरपूरच्या पोट निवडणूक स्वाभीमानी शेतकरी संघटना लढवत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची एफ आर पी आणि १०० युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावे अशी मागणी करत सरकारला विरोधात आंदोलन केले जाईल असा  इशारा  माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिलेला आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com