सोलापूरचे सीओ दिलीप स्वामी कोरोना पाॅझिटिव्ह - Solapur ZP CO Dilip Swamy corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापूरचे सीओ दिलीप स्वामी कोरोना पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा नुकताच कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला, त्यांच्या पाठोपाठ सोलापूर झेडपीचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचाही कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा नुकताच कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला, त्यांच्या पाठोपाठ सोलापूर झेडपीचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचाही कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. 

स्वामी यांनी चार महिन्यांपूर्वीच सोलापूर झेडपीचा पदभार स्वीकारला होता.  सध्या त्यांच्यावरती घरीच उपचार सुरु आहेत.  आवश्यकतेनुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.  पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेत स्वामी हे सक्रिय सहभागी होते. कोरोनाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढून सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी गेल्या दहा महिन्यापासून शर्थीचे प्रयत्न करणा ऱ्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

२१ तारखेला उस्मानाबादचे  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह आले. ते प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घरी उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोवॅक्सिन लशीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता. संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना या नव्या लाटेने राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. यातच आता महाराष्ट्राच्या मंत्रालयातही कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. मंत्रालयातील विविध विभागांतील तब्बल ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे मंत्रालय प्रशासन हादरले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख