'त्या' ४७ कामगारांना परत पाठवा; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

विनापरवानगी एका कंपनीमध्ये आलेल्या ४७ कामगारांचा त्यांच्या राज्यात परत पाठविण्याचे आदेश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांनी पोलिस यंत्रणेला दिले आहेत. तसेच बाहेरुन आलेल्या व होम क्वारंटाईन झालेल्या नागरिकांवर बारीक नजर ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
Shambhuraj Desai Orders to sent 47 workers back
Shambhuraj Desai Orders to sent 47 workers back

रत्नागिरी  : विनापरवानगी एका कंपनीमध्ये आलेल्या ४७ कामगारांचा त्यांच्या राज्यात परत पाठविण्याचे आदेश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांनी पोलिस यंत्रणेला दिले आहेत. तसेच बाहेरुन आलेल्या व होम क्वारंटाईन झालेल्या नागरिकांवर बारीक नजर ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी सभागृह येथे कोव्हिड १९ प्रादुर्भाव व त्याअनुंषगाने केलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्धतेबाबत खबरदारी घ्यावी, ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी जास्त डॉक्‍टरांची नेमणूक करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांबाबत, रुग्णालयातील औषधांची उपलब्धता, अत्यावश्‍यकसाठी बेड, ऑक्‍सीजनचा पुरवठा आदी बाबतचा आढावा श्री. देसाई यांनी घेतला.

या वेळी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. माने, जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते. आमदार राजन साळवी यांनी एका कंपनीत विनापरवानगी आलेल्या ४७ कामगारांचा मुद्दा बैठकीत मांडला. या सर्वांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याच्या सूचना देसाई यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोना रुग्णांसाठीचा आवश्‍यक औषधसाठा जिल्हा रुग्णालयासह सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. शासनाकडून जी औषधे कोरोनासाठी आवश्‍यक आहेत. ती तत्काळ मिळण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली असून ती औषधे लवकरच उपलब्ध होतील, असेही देसाई यांनी सांगितले. अपुरे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी ही मोठी समस्या आहे. जिल्हास्तरावर मुलाखती घेऊन कर्मचारी भरती करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. "वॉक इन इंटरव्ह्यू' घेण्याला तत्वतः मान्यता दिली आहे. त्याची अंमलबजावणीही तत्काळ होईल, असेही ते म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com