शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लाड-आसगावकरांवर नाराज - Sena Leader Unhappy about Arun Lad Jayant Asgaonkar | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लाड-आसगावकरांवर नाराज

सुनील पाटील
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल मध्ये पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांचा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला

कोल्हापूर  : शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने पदवीधर मधून अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर विजयी झाले. आमदार झाले. याचा मला आनंद आहे. मात्र या दोन्ही आमदारांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला फोन केला नाही. शिवसेना आघाडी धर्म म्हणून भविष्यात त्यांच्या मागे राहील यात दुमत नाही. मात्र त्यांनी कोल्हापूरचा जिल्हाध्यक्ष म्हणून फोन केला नाही, अशी खंत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल मध्ये पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांचा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना विजय करण्यामध्ये आपल्या सर्वांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न केल्यामुळे हे दोन्ही होतकरू आमदार पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाला मिळाले आहेत. निश्चितपणे हे दोघेही आपले कर्तृत्व दाखवतील. 

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, दादासाहेब लाड, भैय्या माने, बाबासाहेब देवकर, राजेश पाटील, दिनकर जाधव, भरत रसाळे उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख