राजू शेट्टींकडून कृषी विधेयकांची होळी  - Raju Shetty Burnt Farm Bill Copy in Kolhapur to Support Farmers Agitation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

राजू शेट्टींकडून कृषी विधेयकांची होळी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला आज(मंगळवारी) जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांशी बाजारपेठा बंद होत्या. कोल्हापूर बाजारसमितीत गुळासह भाजीपाला, कांदा बटाटा बाजारही बंद राहिल्याने दररोजची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. 

कोल्हापूर  : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला आज(मंगळवारी) जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांशी बाजारपेठा बंद होत्या. कोल्हापूर बाजारसमितीत गुळासह भाजीपाला, कांदा बटाटा बाजारही बंद राहिल्याने दररोजची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. 

शाहूपुरी, लक्ष्मीपूरी या व्यापारी पेठांमध्येही बंदचा परिणाम जाणवला. दररोजची वर्दळ जाणवली नाही. बंदची कल्पना असल्याने मध्यवर्ती बसस्थान परिसरातही बसेसची तुरळक वर्दळ राहिली. मालवाहतूक वगळता अन्य प्रवासी वाहतूकीवर परिणाम झाल्याचे दृष्य सकाळी दहा वाजेपर्यंत होते. 

दरम्यान शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या विधेयकाचा निषेध करीत विधेयकांच्या प्रतींची होळी केली. हे विधयक शासनाने तातडीने मागे घ्यावे अशी विनंती श्री शेट्टी यांनी यावेळी केली. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी सर्वांनी एकजूट होवून निषेध नोंदविल्याबद्दल श्री शेट्टी यांनी आंदोलनात सहभागी घटकांचे अभिनंदन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर बाजार समिती, गूळ, भाजीपाला मार्केट, राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, सराफ बाजारही बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. त्याशिवाय जिल्ह्यातून विविध संघटना, पक्ष, संघ, व्यापारी, उद्योजक पाठबळ देत आहेत.

केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून शेतकरी संघटनांनी आज भारत बंद ची घोषणा केलेली आहे.  या भारत बंदला महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राज्यात विविध ठिकाणी बंदला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमीश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख