ग्रामपंचायत निवडणुकीत सांगोल्यात शेकापला धक्का  - PWP Got Blow in Sangola Grampanchayt Election | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणुकीत सांगोल्यात शेकापला धक्का 

भारत नागणे
सोमवार, 18 जानेवारी 2021

सांगोल्यातील वासूद अकोले ग्रामपंचायतीवर भाजप तालुकाध्यक्ष केदार गटाने शेकापची पन्नास वर्षांची सत्ता उलथवून टाकत दणदणीत विजय मिळवला आहे. तर जवळा ग्रामपंचायतीत भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या गटाचा दारूण पराभव झाला आहे. 

सोलापूर : सांगोल्यातील वासूद अकोले ग्रामपंचायतीवर भाजप तालुकाध्यक्ष केदार गटाने शेकापची पन्नास वर्षांची सत्ता उलथवून टाकत दणदणीत विजय मिळवला आहे. तर जवळा ग्रामपंचायतीत भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या गटाचा दारूण पराभव झाला आहे. 

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांनी महत्त्व असतं परंतु तालुक्याचे पक्षीय नेते त्या स्थानिक आघाडीचे  नेतृत्व करत असतात. वासुद अकोला ग्रामपंचायती रूपाने सांगोल्यात पहिलीच ग्रामपंचायत जिंकली आहे. मागील पन्नास वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाची एक हाती निर्विवाद सत्ता होती मात्र भाजप तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी ही सत्ता उलथून टाकत भाजपची सत्ता या ग्रामपंचायतीवर आलेली आहे.

तर जवळा ग्रामपंचायत मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या गटाचा दारुण पराभव झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या गटाने 15 पैकी 11 जागा जिंकत भाजप जिल्हाध्यक्ष यांना धोबीपछाड केला आहे.

चिलाई वाडी ग्रामपंचायतीत विठ्ठल कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांना धक्का बसला असून राष्ट्रवादीची  सत्ता गेली आहे.भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाचे वर्चस्व या निवडणुकीत राहिले आहे.  वाडी कुरोलीत भाजपचे वर्चस्व कायम असून कल्याण काळे गटाची सत्ता कायम राहीली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख