कोल्हापुरात कोरोनाबधित पोचले 67 वर 

कोल्हापूर जिल्ह्यात काल एकाच दिवशी 14 जण कोरोनाबाधित झाल्याने धक्‍क्‍यात असलेल्या जिल्हावासियांना सोमवारी एकाच दिवसांत तब्बल 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा धक्का बसला.
 Number of corona patients in Kolhapur 67
Number of corona patients in Kolhapur 67

कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्ह्यात काल एकाच दिवशी 14 जण कोरोनाबाधित झाल्याने धक्‍क्‍यात असलेल्या जिल्हावासियांना सोमवारी एकाच दिवसांत तब्बल 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा धक्का बसला.

पॉझिटीव्ह आलेल्या 18 मध्ये शहरातील पाच जणांचा समावेश असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 67 वर पोचली आहे. यापैकी 12 जण यापूर्वीच कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून उर्वरित रुग्णांवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, काल मध्यरात्री डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या पन्हाळा तालुक्‍यातील तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील संख्या दोन झाली आहे. आज सकाळी पाच, दुपारी दोन अशा सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यात शाहुवाडी, राधानगरी व आजरा तालुक्‍यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे तर एक जण सीपीआरमध्येच उपचारासाठी दाखल झाला होता. सीपीआरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या गावाची माहिती मिळू शकली नाही. 

दुपारी शाहुवाडी तालुक्‍यातील म्हालसवडेच्या दांपत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे पती-पत्नी मुंबईतून शाहुवाडीत दाखल झाले होते, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर सायंकाळी तब्बल 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील पाच, शाहुवाडीतील चौघांचा तर करवीर व पन्हाळा तालुक्‍यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

शहरातील ताराराणी चौकातील माकडवाले वसाहतीतील तीन, राजारामपुरीतील एक महिला व जवाहरनगर येथील तरुणाचाही पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांत समावेश आहे. राजारामपुरीतील बाधित महिला कालच साताराहून कोल्हापुरात आली होती. माकडवाला वसाहतीतील तिघे जण रेड झोन असलेल्या सोलापुरातून आले होते, तर जवाहरनगरचा तरुण पुण्यातून कोल्हापुरात आला होता. या चारही रुग्णांना शहरातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. 

या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षातून सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवाहरनगरचा तरुण पुण्याहून आल्यानंतर सीपीआरमध्येच विलगीकरण करण्यात आले होते, त्याला त्याचे वडील रोज जेवणाचा डबा घेऊन जात होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com