सातारा जिल्ह्यात पदवीधरच्या मतदारयादीत त्रुटी - Many Discrepancies in Satara Graduate Constituency Voters List | Politics Marathi News - Sarkarnama

सातारा जिल्ह्यात पदवीधरच्या मतदारयादीत त्रुटी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उशीरा का होईना मतदारांची यादी प्रसिध्द झाली. पण या यादीत अनेक त्रुटी आहेत. ज्यांची नावे यादीत आहेत, त्याची ऑनलाइन यादीत दिसत नाहीत. तर ज्यांची नावे ऑनलाइन यादीत आहेत, त्यांची नावे प्रसिध्द केलेल्या यादीत नाहीत. तर अनेकांची नावे चुकलेली आहेत.

सातारा  : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उशीरा का होईना मतदारांची यादी प्रसिध्द झाली. पण या यादीत अनेक त्रुटी आहेत. ज्यांची नावे यादीत आहेत, त्याची ऑनलाइन यादीत दिसत नाहीत. तर ज्यांची नावे ऑनलाइन यादीत आहेत, त्यांची नावे प्रसिध्द केलेल्या यादीत नाहीत. तर अनेकांची नावे चुकलेली आहेत. त्यामुळे अशा मतदारांची मतदानावेळी अडचण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्याची सदोष यादी दुरूस्त करू पुन्हा प्रसिध्द करावी, अशी मागणी पक्षाच्या नेत्यांकडून होऊ लागली आहे.

जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतदारांच्या यादीत ५२ हजार ७१ मतदारांची नोंद झालेली आहे. मतदार नोंदणीसाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेससह भाजपच्या नेत्यांनी परिश्रम घेतलेले आहेत. मागील आठवड्यात मतदारांची यादी जिल्हास्तरावरून प्रसिध्द करण्यात आली. ही यादी प्रसिध्द करण्यात जिल्हास्तरावरून उशीर झाला. काही पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतर पक्षांच्या प्रतिनिधींना यादी उपलब्ध झाली. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय यादीची विभागणी करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. पदवीधरसाठी महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशीच खरी लढत असणार आहे. मुळात पदवीधर मतदारांची मतदानाचा टक्का कमी असतो. पण यावर्षी या निवडणुकीत निर्माण झालेली चुरस लक्षात घेता जास्तीत जास्त मतदान करण्याकडे सर्वच पक्षांनी लक्ष घातले आहे.

मतदार यादीच्या मदतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम उमेदवारांचे प्रतिनिधी करतात. पण जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होणार आहे. ज्यांनी नोंदणी केलेली आहे, त्यांची नावे यादीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा मतदारांना मतदान करताना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

पदवीधरचे मतदार : ५९ हजार ०७१
शिक्षकचे मतदार : ७७११
मतदान केंद्रे : १६५
पदवीधर : १२२
शिक्षकसाठी : ४३
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख