Lock Down in Pandharpur from 6th August Midnight | Sarkarnama

पंढरपुरात ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सात दिवस लॉकडाऊन

विश्वभूषण लिमये
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

सोलापूर येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये ६ ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासून  १३ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत  कडक लॉकडाऊन ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पंढरपूर : तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये अखेर सात दिवसाच्या लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली.  आज सोलापूर येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये ६ ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासून  १३ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत  कडक लॉकडाऊन ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ऐन आषाढी वारीच्या काळामध्ये पांढुरपूर मदिरा भोवतालच्या प्रदक्षिणा मार्गावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते, त्यामुळे मुख्यत्वे प्रदक्षिणा मार्गात मोठ्या प्रेमात कोरोना टेस्ट घेतल्या जाणार आहेत.दरम्यान यामध्ये दुग्धजन्य पदार्थ,  मेडिकल्स आणि दवाखान्यांना या लॉकडाऊन मधून वगळण्यात आले आहे.  

या सात दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान येणाऱ्या रिझल्टच्या आधारे यापुढे आणखी तीन दिवस पंढरपूर तालुका आणि शहरात लॉकडाऊन वाढवायचा  किंवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती  सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख