छत्रपतींच्या जिल्ह्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांकडे.....

जिल्हा नेमून दिलेले नेते पक्षाची सविस्तर भूमिका विशद करणार आहेत.
Harshvardhan Patil has the responsibility of Satara district regarding Maratha reservation
Harshvardhan Patil has the responsibility of Satara district regarding Maratha reservation

इंदापूर (जि. पुणे) :  मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार यांनी दिली. (Harshvardhan Patil has the responsibility of Satara district regarding Maratha reservation) 

ऍड. जामदार म्हणाले, हर्षवर्धन पाटील सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार जयकुमार गोरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर तसेच, स्थानिक मराठा समाजाचे नेते व कार्यकर्त्यांची मराठा आरक्षणासंदर्भात संवाद साधणार आहेत. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात मुंबई येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर नेत्यांचे जिल्हा दौरे सुरु करण्यात आले आहेत. भाजप खासदार नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, नरेंद्र पाटील आदी नेते विविध जिल्हांचे दौरे करणार आहेत. 

जिल्हा नेमून दिलेले नेते पक्षाची सविस्तर भूमिका विशद करणार आहेत. या संदर्भात न्यायालयात नेमके काय घडलं, सरकार कुठे चुकले, याविषयी ते मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे अनुभवी आणि अभ्यासू नेते असून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी संसदीय कार्य मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. मंत्रिमंडळामध्ये वीस वर्षे मंत्री म्हणून त्यांनी अनेक खात्याचा कारभार पाहिला असून ते स्वतः कायद्याचे पदवीधर आहेत. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणारे अभ्यासू, कार्यक्षम व व्यक्तिमत्त्व म्हणून ते राज्यात परिचित आहेत. 

छत्रपतींचा जिल्हा असणाऱ्या सातारा जिल्ह्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे लवकरच काम सुरूवात करणार आहेत, असे त्यांनी स्वतः सूतोवाच केले आहे, असेही जामदार यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com