'दूधगंगा'वरून इचलकरंजीसाठीच्या योजनेचा फेरविचार करा : समरजितसिंह घाटगे

दूधगंगा नदीवरून इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजनेचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी समरजितसिंह घाटगे यांनी केली आहे.
government should reconsider about ichalkaranji water project from doodhganga
government should reconsider about ichalkaranji water project from doodhganga

कोल्हापूर : दूधगंगा नदीवरून सुळकुड (ता. कागल) येथून इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेला शासनाने मंजुरी दिली असली तरी याबाबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. कागल, करवीर व हातकणंगले येथील नागरिक या निर्णयाविरोधात संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत. तरी या शासन निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज केली.

घाटगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या या एकतर्फी निर्णयाविरोधात लाभ क्षेत्रातील शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. भविष्यात पाण्यासाठीचा हा लढा आणखी तीव्र होणार आहे. दुधगंगा नदीवर असणाऱ्या काळमवाडी धरणातून या पाण्याचा विसर्ग होत आहे. दूधगंगा धरण 28 टीएमसीचे असून, त्याप्रमाणे त्याच्या पाणीवाटपाचे नियोजन झाले आहे. परंतु, या धरणामध्ये 25 टीएमसी पाणीसाठा होतो ही वस्तुस्थिती आहे.

धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. पुन्हा होऊ घातलेली ही पाणीपुरवठा योजना झाली तर कागल तालुक्‍यातील 39, करवीरमधील 19, राधानगरीतील 32, हातकणंगलेतील 8, भुदरगडमधील 15 व शिरोळमधील 12 अशा एकूण 125 गावातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून, 24 हजार हेक्‍टर सिंचन क्षेत्रावर परिणाम होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

डाव्या कालव्यातील सोळांकूर, पनोरी, निगवे, कावणे येवती, वडकशिवाले, नागाव, नंदगाव, एकोंडी, सिद्धनेर्ली, पिंपळगाव, सांगाव, सुळकुड त्याचबरोबर उजव्या कालव्यातील सरवडे, बोरवडे, बिद्री, वाळवे, बेलवळे, बाचणी, खेबवडे, बामणी शेंडूर, सिद्धनेर्ली , करनूर, वंदूर, लिंगनूर या गावासह कागल व करवीर तालुक्‍यातील इतर गावांतील शेतीवर हा परिणाम होणार आहे. तसेच, कागल शहर व परिसर पिण्याच्या पाण्यासाठी या नदीवरच अवलंबून असून त्यास मोठा फटका बसू शकतो. हा या लोकांच्यावर फार मोठा अन्याय आहे, असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.

सध्या या धरणात होत असलेल्या 25 टीएमसी पाणीसाठयातून कर्नाटक राज्याला चार टीएमसी पाणी जाते. त्यामुळे पाणी नियोजननुसार पाणी अपुरे पडते, या नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर भूमिका मांडताना कागल करवीर मधील  ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांचा विचार करून या योजनेबाबत फेरविचार करण्याची आग्रही मागणी घाटगे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com