...म्हणून मी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला 

मात्र तोपर्यंत ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते.
Gopichand Padalkar's car attacked for publicity : Amit Survase
Gopichand Padalkar's car attacked for publicity : Amit Survase

सोलापूर  : ‘‘मी कोणाच्याही सांगण्यावरून नव्हे तर माझ्या स्वत:च्या प्रसिद्धीसाठीच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकला', असे संशयित आरोपी अमित सुरवसेने पोलिसांना सांगितले. तर "मला काहीच माहिती नव्हते, अमित चल म्हणाला म्हणून मी त्याच्यासोबत गेलो होतो,' अशी कबुली नीलेश  क्षीरसागर याने दिली.  (Gopichand Padalkar's car attacked for publicity : Amit Survase)

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरील हल्लाप्रकरणी या दोघांना शनिवारी गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना जोडभावी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यासंदर्भात आणखी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम दिली.

आमदार गोपीचंद पडळकर हे घोंगडी बैठकीसाठी 30 जून रोजी सोलापुरात आले होते. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर नाराज होऊन अमितने दगडफेकीचा प्लॅन केला, असा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी आता तपास सुरू केला.

दरम्यान, हल्ल्यानंतर दोघेही पसार झाले होते. सायबर क्राईमच्या मदतीने त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पाहण्यात आले. पहिल्या दिवशी सावळेश्‍वर (ता. मोहोळ) टोल नाक्‍यापर्यंत तर पुन्हा त्याच परिसरात व सात रस्ता परिसरात त्यांचे लोकेशन दाखविले. शनिवारी (ता.3) पोलिसांना ते दोघेही बक्षीहिप्परगा येथील शेतात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांनाही पकडले. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

घटनेनंतर अमित सुरवसे व नीलेश क्षीरसागर यांनी सोलापूर शहरातून काढला पळ काढला. सावळेश्‍वर टोल नाक्‍यावर सीसीटीव्ही असल्याने त्यांनी मार्ग बदलला. गेली दोन दिवस त्यांचा दहिटणे, बक्षिहिप्परगा व सोलापूर शहर परिसरात दुचाकीवरून वावर सुरू होता. मास्क लावून हॉटेलमधून पार्सल जेवण घेऊन जायचे. एखाद्या शेतात मुक्‍काम करायचे.  

अमित सुरवसे व नीलेश क्षीरसागर हे दोघेही बक्षीहिप्परगा याठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी वेशांतर केले. चक्क शेतकऱ्याचा वेष धारण करून गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याजवळ पोचले. अगदी जवळ आल्यानंतर त्या दोघांना ते पोलिस असल्याचे समजले. मात्र तोपर्यंत ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. 
 
सापळ रचून केली अटक

आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा निषेध व्यक्‍त करीत त्यांच्या समर्थकांनी शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे त्या दोघांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दोन दिवसांपासून जोडभावी पेठ पोलिस व गुन्हे शाखेचे पोलिस त्यांच्या मागावर होते.

ते दोघेही बक्षीहिप्परगा येथील एका शेतातील झाडाखाली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील शंकर मुळे, राजेश चव्हाण, विद्यासागर मोहिते, सुहास अर्जुन, सनी राठोड, राहूल गायकवाड, विजयकुमार वाळके यांनी संशय येणार नाही, असा शेतकऱ्यांचा वेश धारण केला. सापळा रचून त्या दोघांना शिताफिने पकडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com