पडळकर यांचे बोलवते धनी फडणवीसच : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने केला आरोप

जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर गोपीचंद पडळकर अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर चोहोबाजूंनी टिका होत आहे. त्यांच्या विधानाबाबत अॅड. मुळीक यांनी 'त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे'असं म्हटलं आहे.
Devendra Fadanavis Behind Padalkars Statement Allege NCP Leader
Devendra Fadanavis Behind Padalkars Statement Allege NCP Leader

पुणे : गोपीचंद पडळकर यांचे बोलवते धनी देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जे बोलायचे होते ते पडळकर यांच्या तोंडून बोलून घेतले आहे."असा आरोप सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी केला आहे.

जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर गोपीचंद पडळकर अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर चोहोबाजूंनी टिका होत आहे. त्यांच्या विधानाबाबत अॅड. मुळीक यांनी 'त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे'असं म्हटलं आहे.

"देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमुळे ते अडचणीत आले. सगळी चर्चा त्या मुलाखतीबद्दल व्हायला लागली तेव्हा तिकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पडळकर यांना वादग्रस्त विधान करायला लावले."असे मुळीक यांनी म्हटले आहे.

"पडळकर यांना तसं बोलायला लावलं गेलं आहे.पडळकर यांनी ते विधान केल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुलाखतीत अडचणीत आले होते. ती चर्चा बंद झाली आणि सगळी चर्चा पडळकर यांच्या दिशेने व्हायला लागली." असेही मुळीक म्हणाले. 

"पडळकर यांच्या विधानाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील समर्थन करतात ही गंभीर बाब आहे. त्यांनी पडळकर यांचे समर्थन केल्यामुळे हे सगळं ठरवून झालं आहे. पडळकर एकाएकी शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करतात यामागे सगळ्या गोष्टी ठरवून झाल्या आहेत."असा आरोप अॅड. मुळीक यांनी केला आहे. दरम्यान पडळकर यांच्या विधानाचा खानापूर आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com