अकोला जिल्हा परिषदेत 'वंचित'ला जबर धक्का

अकोला जिल्हा परिषदेच्या 'ओबीसी' प्रवर्गातील १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या ओबीसी प्रवर्गाच्या २४ जागाही रिक्त झाल्याचा राज्य निवडणूक आयोगाने दिलेला आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला.
Akola Jillha Parisad
Akola Jillha Parisad

अकोला : गतवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या  जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाचे (ओबीसी)प्रवर्गाचे आरक्षण क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द करुन पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

त्यानुसार अकोला जिल्हा परिषदेच्या 'ओबीसी' प्रवर्गातील १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या ओबीसी प्रवर्गाच्या २४ जागाही रिक्त झाल्याचा राज्य निवडणूक आयोगाने दिलेला आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला.

वंचितचे सर्वाधिक सदस्य
वंचित -- 8 सदस्य

सेना - 1 सदस्य

भाजप- 3 सदस्य

काँग्रेस- 1 सदस्य

राकाँ - 1 सदस्य एकूण 14 सदस्य.

पालघरमध्ये राजकीय भूकंप

पालघर : पालघर जिल्हा परिषदेतील 15  तर जिल्ह्यातील विविध पंचायत समितीमधील 14 सदस्य पदांची पदे ।जिल्हाधिकारी यांनी  रद्द केली आहेत. जिल्ह्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीचे एकूण 29 सदस्यांची पदे रद्द झाली असल्याने  जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असताना नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक झाल्याने  जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य पदे रद्द करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ यांनी हे आदेश 6 मार्च रोजी काढले असून ज्या सदस्यांची पदे रद्द झाली आहेत त्यांच्यापर्यंत हे आदेश पोचवले जाणार आहेत.

ही सदस्य पदे रद्द झाल्यानंतर पुन्हा नव्याने आरक्षण पडून त्या ठिकाणी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती सुशील चोरी महिला बालकल्याण सभापती अनुष्का ठाकरे राष्ट्रवादीचे गटनेते नरेश आकरे यांचे सदस्य पदे रद्द झाले आहे. या निर्णयाने जिल्हा परिषदेतील महाविकासआघाडीच्या बहुमताचे आकडे घसरले आहेत.तर विरोधी पक्ष भाजपच्या सदस्यांचीही घसरण झाली आहे. 

महाआघाडीला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी  15 पैकी 4 जागा निवडून आणाव्या लागणार आहेत.पालघर जिल्हा परिषदेत गेल्या सव्वा वर्षांपूर्वी  57  सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 18,राष्ट्रवादी 14,भाजप 12, माकप 5, बहुजन विकास आघाडी 4, काँग्रेस 1 तर अपक्ष 3 असे सदस्य निवडून आले होते.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com