सिंधुदुर्गवासियांच्या हक्काचे दोनशे कोटी परत द्या : प्रमोद जठार

जिल्हा नियोजनमधील १०० कोटी व चांदा ते बांदा योजनेतील १०० कोटी असे दोनशे कोटी रुपये विकासनिधी सरकारने परत नेला आहे.हे सरकार कोहोळा काढून आपल्या सर्वांच्या हाती आवळा देण्याचे काम करत आहे असा आरोप भाजपनेते प्रमोद जठार यांनी येथे केला
BJP Leader Pramod Jathar Demands Sindhudurg Development Fund Back
BJP Leader Pramod Jathar Demands Sindhudurg Development Fund Back

कुडाळ : ''ठाकरे सरकारने सिंधुदुर्गवासियांच्या हक्काचे  दोनशे कोटी रूपये काढून घेतले ते परत करावे. जिल्हा नियोजनमधील १०० कोटी व चांदा ते बांदा योजनेतील १०० कोटी असे दोनशे कोटी रुपये विकासनिधी सरकारने परत नेला आहे. या सरकारचा मी जाहीर निषेध करीत आहे,'' असे भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

कोरोनाचे जागतिक संकट असतानासुद्धा फक्त या सरकारने वीस लाख रुपये खर्च केल्याचा आरोपही त्यांनी केला.  श्री. जठार यांनी आज एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, राजू राऊळ, अविनाश पराडकर, बंड्या सावंत आदी उपस्थित होते. हे सरकार कोहोळा काढून आपल्या सर्वांच्या हाती आवळा देण्याचे काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. 

यावेळी श्री. जठार म्हणाले, ''दोन दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाचा कोकणला फटका बसला. त्यावेळी ठाकरे सरकारने कोकणसाठी २५ कोटी रुपये जाहीर केले. वास्तविक पाहता जिल्हा नियोजनमधील १०० कोटी व चांदा ते बांदा योजनेतील १०० कोटी असे दोनशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्याचा विकासनिधी या सरकारने परत नेला असून या आमच्या हक्काच्या पैशातूनच त्यांनी २५ कोटी जाहीर केले. हे २०० कोटी रुपये जिल्ह्याला परत दिले पाहिजेत, ही आमची जिल्हावासीयांच्या वतीने रास्त मागणी आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com