श्री विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी भगिरथ भालके बिनविरोध - Bhagirath Bhalke Elected Unopposed as Chairman of Vitthal Sugar Factory | Politics Marathi News - Sarkarnama

श्री विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी भगिरथ भालके बिनविरोध

भारत नागणे
सोमवार, 21 डिसेंबर 2020

गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगिरथ भालके यांची आज  बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे कारखान्याचे अध्यक्षपद  रिक्त होते

पंढरपूर : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगिरथ भालके यांची आज  बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे कारखान्याचे अध्यक्षपद  रिक्त होते.

रिक्त अध्यक्षपदासाठी आज सहाय्यक निबंधक एम एस तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी भगिरथ भालके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्यण अधिकारी एस.एस.तांदळे यांनी जाहीर केले.

कारखान्याच्या एकूण २१ पैकी ३ संचालकांचे निधन झाले आहे. आज बैठकीला उपस्थित असलेल्या १८ संचालकानी भगिरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली. दरम्यान कारखान्याचे संचालक व कै. औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. परंतु संचालकांमध्ये झालेल्या बैठकीत भगिरथ भालकेंच्या नावावर एकमत झाले.

भगिरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून संचालक मंडळात काम करत आहेत. त्यापूर्वी आमदार भालके हे २००२ पासून कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे सलग १८ वर्षे कारखान्याचे अध्यक्ष पद होते. अलीकडेच आमदार भारत भालके यांचे निधन झाले. त्यानंतर विठ्ठल चे अध्यक्ष पद कोणाकडे जाणार या विषयी विठ्ठल परिवाराचे लक्ष लागले होते. 

पाच सहा दिवसापूर्वी शरद पवार भालके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सरकोली येथे आले होते. त्यावेळी पवारांनी भगरिथ  भालके यांना संधी देण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत सर्वच संचालकांनी भगिरथ भालके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची बिनविरोध निवड केली. निवडी नंतर विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे यांनी भगिरथ भालके यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख