तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही, तुम्ही भूमिका घ्या, असा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता...

तीच मंडळी आज निवडणुकीला परिचारक उभारलेले नाहीत, त्यामुळे आम्हाला मते द्या, असे सांगत फिरत आहेत.
You will not get a candidature, you take a stand, was the advice given by the NCP leaders
You will not get a candidature, you take a stand, was the advice given by the NCP leaders

पंढरपूर  ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी 2009 मध्ये (कै.) सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या उमेदवारीचा त्याग केला. त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी जी आश्वासने दिली होती, ती पाळली नाहीत. उलट (कै.) सुधाकपतांना एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला केले. अशाही परिस्थितीत 2014 पर्यंत आम्ही राष्ट्रवादीचे काम प्रामाणिकपणे केले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 2014 मध्ये आम्हाला उमेदवारी देता येणार नाही. तुम्हाला राजकारणासाठी जी भूमिका घ्यावी लागेल ती घ्या असा सल्ला दिला होता. त्यामुळे भाजप आणि शेतकरी संघटनेशी चर्चा करुन शेतकरी संघटनेची उमेदवारी आपण घेतली. तेव्हापासून आपण भाजपचे काम करत आलो आहे, असे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी सांगितले. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार संजय शिंदे यांनी परिचारक आणि आमचे काय ठरले आहे, ते 17 तारखेनंतर कळेल अशा आशयाचे वक्तव्य केले. त्या संदर्भात परिचारक स्पष्टीकरण देताना बोलत होते. 

आमदार परिचारक म्हणाले की, आज जी मंडळी घरोघरी जात आहेत, त्यांनीच भालके यांच्याशी संगनमत करुन आपल्याला टार्गेट करून संपवण्याचा प्रयत्न केला होता. तीच मंडळी आज निवडणुकीला परिचारक उभारलेले नाहीत, त्यामुळे आम्हाला मते द्या, असे सांगत फिरत आहेत.

सन 1980 असो, 2009 अथवा 2019 असो पक्ष नेतृत्वाने जेव्हा-जेव्हा सांगितले, त्या-त्यावेळी आमच्या घराण्याने कायम नेत्यांवर, पक्षावर विश्वास ठेवून उमेदवारीचा त्याग केला आहे. आम्ही कसे आहोत, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. आत एक आणि बाहेर एक असे राजकारण कधीच केले नाही. 

(कै.) सुधाकरपंतांचे निधन हा पांडुरंग परिवारातील प्रत्येक घटकाला बसलेला मोठा धक्का आहे. त्यासाठी शेतकरी आजही हळहळत आहेत. पांडुरंग परिवारातील संस्था अधिक चांगल्या पद्धतीने चालवणे, सक्षम करणे याला आम्ही अधिक महत्व देतो. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत.

समाधान आवताडे यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्ही पाठींबा दिला असून आम्ही आमच्या निवडणुकीपेक्षा जास्त झोकून देऊन प्रचार करतोय. त्यामुळे समाधान आवताडे निश्‍चित विजयी होतील, यात शंकाच नाही, असा दावाही परिचारक यांनी या वेळी बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com