पुणे महापालिका कोरोना रुग्णांच्या घरांवर लावणार स्टीकर तर चौकात बॅनर - Stickers Will be Pasted in Pune on Corona Patients Homes | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

पुणे महापालिका कोरोना रुग्णांच्या घरांवर लावणार स्टीकर तर चौकात बॅनर

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 15 मे 2020

'क्वारंटाईनचा' शिक्का असूनही काहीच जण त्यावर रामबाण उपाय म्हणून ज्या कुठच्या भागांत कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या परिसरात आणि अगदी रुग्णांच्या घराच्या दारावर आणि तिथल्या चौकातच 'इथे फिरकू नका, इथे कोरोना रुग्ण आहे,' अशा आशयाचे स्टिकर आणि रुग्णांच्या घरालगतच्या मार्गांवर काही तसे पत्रक लावले जाईल

पुणे  : पुणेकरांनो, तुमच्या भागांतली दुकाने उघडलीत, तुम्ही रस्त्यांवरून फिरू लागलात, पोलिसही हटकत नाहीत, म्हणून उगाचच कुठेही फिरू नका...कारण ? 'इथे कोरोना रुग्ण आहे, मग तुम्हीच ठरवा पुढे काय करायचे? हे आता अधिक ठळकपणे सांगितले जाणार आहे. आता ही माहिती स्टिकरच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांपुढे ठेवून महापालिका तुम्हाला वेळीच सावध करणार आहे.

पुण्यातल्या लॉकडाउनमध्ये थोडीशी कुठे सवलती मिळाली अन रस्तोरस्ती लोकांची गर्दी होऊ लागलीय. एवढंच काय ? कोरोना संशयितांची वावर वाढलाय...हातवर 'क्वारंटाईनचा' शिक्का असूनही काहीच जण त्यावर रामबाण उपाय म्हणून ज्या कुठच्या भागांत कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या परिसरात आणि अगदी रुग्णांच्या घराच्या दारावर आणि तिथल्या चौकातच 'इथे फिरकू नका, इथे कोरोना रुग्ण आहे,' अशा आशयाचे स्टिकर आणि रुग्णांच्या घरालगतच्या मार्गांवर काही तसे पत्रक लावले जाईल. मात्र, त्यावर रुग्ण आणि त्याबाबतची माहिती दिली जाणार नाही, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरात बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांतील व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. मात्र
अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांनी बाहेर यावे अन्यथा येऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. तरीही सर्रास लोक घराबाहेर येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यात रोज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याचेही आकडे पुढे येत आहेत.

स्टीकर पाहून तर नागरिक घरात थांबतील

प्रादुर्भाव रोखण्यासाठी एवढे प्रयत्न करूनही रुग्ण वाढत आहेत आणि लोक रस्त्यांवर येत असल्याने आता त्या त्या भागांतील रुग्णांच्या घरांच्या दारांवर छोटेखानी स्टिकर आणि अन्य शक्य त्या ठिकाणी म्हणजे, रस्ते, चौकात बॅनर लावण्याचे नियोजन महापालिका करीत आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर येण्याचे धाडस करणार नाहीत, याची आशा महापालिकेला आहे.

सर्व बाधित क्षेत्रात होणार अंमलबजावणी

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, "पुणे शहरात कोरोनाचा रुग्णांची संख्या कमी करणे हेच उद्दिष्ट आहे. त्यासाठी आता रुग्णांच्या घराच्या दारावर स्टिकर्स लावले जातील. ज्यामुळे या आजाराचा संसर्ग होणार नाही. या मोहिमेबाबत चर्चा झाली आहे; त्याची अंमलबजावणी करणार आहोत. बाधित क्षेत्रासह सर्वत्र हा उपाय करण्यात येईल."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख