पुण्याचे नवे गोल्डमॅन प्रशांत सपकाळही आज जाणार राष्ट्रवादीत! (व्हिडिओ) - Pune Goldman Prashant Sapkal to enter NCP today | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्याचे नवे गोल्डमॅन प्रशांत सपकाळही आज जाणार राष्ट्रवादीत! (व्हिडिओ)

सागर आव्हाड
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

एकनाथ खडसे यांच्यासोबत पुण्यातील गोल्डमॅन प्रशांत सपकाळ हे सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा सपकाळ यांनी केलाय. 

पुणे : एकनाथ खडसे यांच्यासोबत पुण्यातील गोल्डमॅन प्रशांत सपकाळ हे सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा सपकाळ यांनी केलाय. 

सपकाळ यांचे संपूर्ण महाराष्ट्रात मोठे फॅन फॉलोअर्सवर आहेत. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल असही सपकाळ याचे म्हणणे आहे.  अंगावर तब्बल पाच किलोचं सोन्याचे दागिने घेऊन प्रशांत फिरतो. प्रशांत याचे घड्याळ, कडे हे सगळं सोन्याचे आहे. चेनचा विळखाच त्याच्या गळ्याला दिसतो. आता एवढं सोनं घालणार म्हटल्यावर प्रशांतभोवती आठ बाऊन्सर्सचा गराडा असतो. २८ वर्षांचा प्रशांत सपकाळ संगीतकार बप्पी लाहिरी यांचा फॅन असल्याचं सांगतो. त्यांच्यामुळेच आपण सोन्याकडे आकर्षित झाल्याचं तो सांगतो. प्रशांत व्यवसायानं बिल्डर आहे.

खडसेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश
भाजपला रामराम केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. राज्यातील ही सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे. गेल्या बुधवारी खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वचा दोन ओळीत राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला केला होता. केवळ आणि केवळ फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला. त्यांनी आपल्याला त्रास दिला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी म्हटले होते. 

जवळजवळ चार दशकं भाजप घालविलेल्या खडसे यांच्या सारख्या नेत्यांना पक्षाला सांभाळून ठेवता आले नाही. राज्यात २०१४ मध्ये जेव्हा भाजपचे सरकार आले त्यावेळी खडसेंना वाटले होते, की आपणास मुख्यमंत्री केले जाईल. पण, तसे काही झाले नाही. फडणवीस मुख्यमंत्री बनले. त्या दिवसापासून या दोन्ही नेत्यांमध्ये खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरवात झाली. खडसे हे फडणविसांच्या मंत्रिमंडळातही होते. पुढे त्यांना भोसरी जमीन घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागला. गेली चार वर्षे ते भाजपत होते. या वर्षात त्यांनी फडणविसांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख