नितेश राणे म्हणतात......माझा नेता लय पॉवरफुल!!! - Nitesh Rane Says My Leader is Most Powerful | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

नितेश राणे म्हणतात......माझा नेता लय पॉवरफुल!!!

शिवप्रसाद देसाई 
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

सिंधुदुर्गात शासकीय मेडीकल काॅलेजची मागणी होत होती. या काॅलेजमुळे जिल्ह्यात सुसज्ज हाॅस्पीटल मिळणार होते. याला काल मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. याचे श्रेय शिवसेनेने घेतले. त्यावर नितेश राणे यांनी ट्वीटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे

सावंतवाडी  : माझा नेता लय पॉवरफुल!!!अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. हे महाविद्यालय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडीकल काॅलेजच्या अगदी जवळ मंजूर झाले आहे. याच्या मंजूरीचे श्रेय शिवसेनेने घेतले आहे. 

सिंधुदुर्गात शासकीय मेडीकल काॅलेजची मागणी होत होती. या काॅलेजमुळे जिल्ह्यात सुसज्ज हाॅस्पीटल मिळणार होते. याला काल मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. याचे श्रेय शिवसेनेने घेतले. पेढे वाटून आणि फटाके फोडून त्यांनी आनंद व्यक्त केला. हे काॅलेज ओरोसला होणार आहे. येथून जवळच पडवे येथे राणेंचे मेडीकल काॅलेज आहे. तिथे सुसज्ज हाॅस्पीटलही आहे. 

या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी शासकीय मेडीकल काॅलेज मंजूरीही राणेंमुळेच झाल्याचे म्हटले आहे. त्यानी ट्विट केले आहे की,"नारायण राणे  या नावाचा दबदबा सत्ता असो की नसो.. सिंधुदुर्ग च्या राजकीय प्रवासात 1990 पासुन कोणच थांबवु शकले नाही..या तर प्रकल्प राणेंच्या माध्यमातुन होतात किंवा त्यांच्या मुळे केले जातात..शेवटी सगळ काही एकाच व्यक्तिच्या मुळे ! 
माझा नेता लय पॉवरफुल!!!'
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख