कुणाला उद्देशून म्हणाले रोहित पवार?....माझ्यासाठी नातं महत्त्वाचं - NCP Rohit Pawar commented about Book | Politics Marathi News - Sarkarnama

कुणाला उद्देशून म्हणाले रोहित पवार?....माझ्यासाठी नातं महत्त्वाचं

विश्वभूषण लिमये
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

रोहित पवारांना बळ देण्यात आलं असून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना डावललं जात असल्याचा दावा लेखिका प्रियम गांधी यांनी 'ट्रेंडिंग पॉवर' या पुस्तकात केला आहे. यावर माझ्यासाठी नातं महत्त्वाचं आहे, पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीपेक्षा नातं कसंय हे मला जास्त माहित आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

सोलापूर : रोहित पवारांना बळ देण्यात आलं असून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना डावललं जात असल्याचा दावा लेखिका प्रियम गांधी यांनी 'ट्रेंडिंग पॉवर' या पुस्तकात केला आहे. यावर माझ्यासाठी नातं महत्त्वाचं आहे, पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीपेक्षा नातं कसंय हे मला जास्त माहित आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

रोहित पवारांना बळ देण्यात आले असून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना डावललं जात असल्याचा दावा लेखिका प्रियम गांधी यांनी आपल्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकात केला आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलं. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

"तसेच कोणतंही पुस्तक हे लेखकाच्या डोक्याने लिहिलं जातं. आज कोणत्या समस्या आहेत याबाबत वाचण्यात माझा जास्त वेळ जातो. त्यामुळे हे जे काही पुस्तक आलेलं आहे. मी केवळ त्याचा कव्हर पेज पाहिलं आहे. आतमध्ये काय लिहिलं आहे याबाबत मला माहिती नाही. पुस्तकात आणखी काही गोष्टी लिहिल्याचं कळलं. त्यांना ही माहिती कुठून मिळाली हे पुस्तक लिहणाऱ्या व्यक्तीलाच विचारावं लागेल," असंही रोहित पवार म्हणाले.

पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळपास सहा विविध ठिकाणी सभा देखील घेतल्या. करमाळा, टेंभूर्णी, मोहोळ, बार्शी, कुर्डूवाडी इत्यादी ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी मेळावे, बैठका, सभा घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. या सभांना तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

सोलापुरातील निर्मलकुमार फडकुले सभागृहात आमदार रोहित पवार यांच्यासह सेल्फी घेण्यासाठी, सत्कार करण्यासाठी युवकांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार भाजपला पाठिंबा देणार होते, असा दावा प्रियम गांधी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकात करण्यात आला आहे. तसंच पार्थ पवारांना डावललं जातंय आणि रोहित पवारांचं बळ वाढवलं जातं आहे असं या पुस्तकात म्हटलं आहे. त्यामुळे पवार घराण्यात सारं काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. परंतु रोहित पवार यांनी हे सगळे दावे फेटाळले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख