हिरवे पेन घेतले अन् आमदार बाळासाहेब पाटील मंत्री झाले - Green Pen is Maharashtra Ministers Protocol Say Balasaheb Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

हिरवे पेन घेतले अन् आमदार बाळासाहेब पाटील मंत्री झाले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 मार्च 2021

हिरवे पेन हा महाराष्ट्रातील सर्वच मंत्र्यांचा प्रोटोकॉल आहे. मुख्यमंत्री लाल पेन वापरतात. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील काळ्या शाईचे पेन वापरतात. मात्र, या निवडणुकीत निवडून आल्यावर त्यांनी ठरवले की हिरव्या शाईचे पेन वापराचे आणि मग बाळासाहेब चक्क मंत्री झाले

सातारा : हिरवे पेन हा महाराष्ट्रातील सर्वच मंत्र्यांचा प्रोटोकॉल आहे. मुख्यमंत्री लाल पेन वापरतात. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील काळ्या शाईचे पेन वापरतात. मात्र, या निवडणुकीत निवडून आल्यावर त्यांनी ठरवले की, काही झालेतरी हिरव्या शाईचेच पेन वापरायचे. निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्यांना स्वीय सहाय्यकाने  हिरव्या शाईचा पेन आणून दिले. काही दिवसांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि बाळासाहेब  पाटील सहकार मंत्री झाले. (Green Pen is Maharashtra Ministers Protocol Say Balasaheb Patil)

सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील शनिवारी पत्रकारांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांनी हातात असलेल्या कागदावर हिरव्या रंगाच्या पेनने काही सूचना लिहून घेतल्या होत्या. यावरून त्यांना विचारले असता प्रश्न विचारला असता ते  म्हणाले, ''हिरवे पेन हा महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच मंत्र्यांचा प्रोटोकॉल आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) लाल पेन वापरतात. मी आमदार असल्यापासून काळ्या रंगाचे पेन वापरत होतो. मात्र, या निवडणुकीत मी आमदार म्हणून निवडून आलो आणि त्याच दिवशी ठरवले होते की, काही झाले तरी आता आपण हिरव्या शाईचाच पेन वापरायचे,''

''निकालाच्या दुसऱ्या दिवशी मला लोक भेटायला येत होते आणि माझे अभिनंदन करत होते. त्याचवेळी मी ठरवल्या प्रमाणे माझ्या स्वीय सहाय्यकांने हिरव्या शाईचे पेन आणून दिले. त्यानंतर ते माझ्या कायमच खिशाला राहिले. नेमकी काय गमंत झाली बघा. काही दिवसांनी आमचेच सरकार आले आणि माझ्याकडे असणाऱ्या हिरव्या रंगाच्या शाईच्या पेनचा किती उपयोग झाला, याची मला अनुभूती आली,' असे सांगत त्यांनी आपला आत्मविश्वास किती प्रबळ होता, याचाही दावा केला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख