पंतप्रधान होण्याइतकी उद्धव ठाकरे यांची ताकद नाही  ः आठवले यांचा टोला (व्हिडीओ)

पंतप्रधान होण्याइतकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ताकद नाही. देशभरात त्यासाठी पक्षाचे खासदार असावे लागतात, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.
Uddhav Thackeray does not have the strength to become the Prime Minister: Athavale
Uddhav Thackeray does not have the strength to become the Prime Minister: Athavale

नवी मुंबई : पंतप्रधान होण्याइतकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ताकद नाही. देशभरात त्यासाठी पक्षाचे खासदार असावे लागतात, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. 

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेत उलवे येथील डोंगरामधील वादग्रस्त लेण्यांना भेट देण्यास आठवले सोमवारी (ता. २७ जुलै) आले होते. त्या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आठवले बोलत होते. 

या वेळी आठवले यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा नारा दिला होता. तो आजही आमच्या स्मरणात आहे, असे आठवले यांनी सांगितले. उद्वव ठाकरे यांनी भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग केला होता. त्यातूनच राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आले होते.

मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आज आमच्या सोबत असते तर अधिकच आनंद झाला असता. परंतु ते आज  आमच्यासोबत नाहीत, याची आमच्या मनात नाराजी आहे. पुढच्या वाढदिवसापर्यंत ते आमच्यासोबत आले तर त्यांचा वाढदिवस आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करू, असा आशावादही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामानात सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाटचाल सह्याद्रीकडून हिमालयाकडे, असे लिखाण करण्यात आले आहे. शिवसेना यावरून उद्धव ठाकरे हे लवकरच देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री रामदास आठवले यांना विचारला. त्या वेळी आठवले यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. मला ही राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे आहे; पण माझ्या पक्षाचा एकही आमदार राज्यात निवडून येत नाही.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या १८ खासदारांच्या जिवावर पंतप्रधान होता येणार नाही. पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्राबाहेर देशातील विविध राज्यांमध्ये सत्ता असावी लागते. मात्र, शिवसेना हा पक्ष फक्त महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेना वाढणार नाही. त्यामुळे पंतप्रधान होण्याइतकी उद्धव ठाकरे यांची ताकद नाही, असा टोला मंत्री रामदास आठवले यांनी लगावला. तसेच, सर्वजण योध्यावरून जाऊन आल्यावर आपण तिकडे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com