ठाकरेंचे काम उत्तम; सरकार पाच वर्षे टिकणार 

देशावर संकट असताना राजकारण करण्याची ही वेळ नाही. त्यामुळे कुणाचे काय चुकले, यावर चर्चा करण्यापेक्षा संकटाच्या या काळात सर्वांनी एकत्र येऊन सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
Thackeray's work is excellent; The government will last for five years
Thackeray's work is excellent; The government will last for five years

पुणे : देशावर संकट असताना राजकारण करण्याची ही वेळ नाही. त्यामुळे कुणाचे काय चुकले, यावर चर्चा करण्यापेक्षा संकटाच्या या काळात सर्वांनी एकत्र येऊन सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज (ता. 25 जून) व्यक्त केले. 

एका राष्ट्रीय वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पवार यांनी चीनच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी शक्‍य होईल तेवढ्या लवकर सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली. 

देशासमोरच्या संकटावर चर्चा करण्यासाठी संसद हे सर्वात प्रभावी व महत्वाचे माध्यम आहे. संसदेत चर्चा झाली तर देशातील लोकांना वस्तुस्थिती काय आहे, ते समजेल. त्यामुळे संसदेचे अधिवेशन बोलाविण्याची गरज आहे. 

चीनची घुसखोरी व वीस भारतीय जवानांच्या बलिदानाला जबाबदार धरून कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी केंद्र सरकारवर करीत टीका करीत आहेत.

या संदर्भाने विचारले असता पवार म्हणाले, "सर्वपक्षीय बैठकीत सोनिया गांधी यांनीही सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, गेल्या काही वर्षातील चुकांमुळे आताची परिस्थिती ओढावल्याची त्यांची भावना आहे. मात्र, कोण चुकले यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. सर्व भारतीयांनी एकत्रितपणे भारतीय सैनिकांच्या मागे समर्थपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. भारताची एक-एक इंच भूमी सुरक्षित कशी राहील, याकडे आता साऱ्यांचे लक्ष असायला हवे, त्यामुळे कोणताही वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.' 

"देशाचा संरक्षण मंत्री म्हणून मी काम केले आहे. त्यामुळे चीनबरोबर लढताना सीमेवरील लढाईपेक्षाही राजकीय मुत्सद्देगिरीतून मार्ग निघू शकतो. राजकीय मुत्सद्देगिरीसाठी पुरेशी राजकीय जागरूकता आवश्‍यक आहे. चीनबरोबर सीमेवर डोळ्यात तेल घालून भारतीय सैनिक लढत आहेत. त्याचवेळी यावर व्यापक चर्चा होऊन प्रत्येक भारतीयाला विश्‍वास देण्यासाठी संसदेत यावर चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर संसदेचे अधिवेशन बोलविण्याची गरज आहे,' असे पवार यांनी स्पष्ट केले. 

मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट कमी होत आहे. धारावीतील तसेच मुंबई व महाराष्ट्रातील स्थिती सुधारत आहे. त्यामुळे येत्या काळात लॉकडाउन शिथिल करून दैनंदिन चक्र सुरू करण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

राज्यात कोरोनाची स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तमरित्या हाताळत आहेत. आघाडीतील तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्‍चितपणे पूर्ण करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com