म्हारो टिकैत, संजय राऊत अन् शेतकरी आंदोलन...

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दुपारी दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेत राऊत यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
Shivsena MP Sanjay raut meet Farmer leader Rakesh Tikait at gajhipur border
Shivsena MP Sanjay raut meet Farmer leader Rakesh Tikait at gajhipur border

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दुपारी दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेत राऊत यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी  'गाझीपूर बॉर्डर, म्हारो टिकैत' असा मजकूर व दोघे हात उंचावत असलेले छायाचित्र ट्विट केले आहे. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला होता. तर राज्यसभेत विरोध केला होता. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. महाविकास आघाडीचे नेते या मोर्चाला उपस्थित होते. या मोर्चाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे दोघेही या मोर्चाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. 

मंगळवारी राऊत यांनी शिवसेनेचे खासदार आंदोलकांना भेटणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार राऊत यांच्यासह शिवसेनेचे अन्य खासदार राकेश टिकैत यांना भेटले. या भेटीमध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनाला शिवेसनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. 

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, 'टिकैत यांना भेटल्यानंतर आमचा पाठिंबा असल्याचे सांगितले. सरकारने शेतकऱ्यांशी योग्य मार्गाने चर्चा करायला हवी. देश चालविण्यासाठी अहंकार उपयोगी पडत नाही,' अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. 

टिकैत यांनी ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, विविध पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ते याठिकाणी भेटायला येत असतात. आम्ही यामध्ये राजकारण करत नाही. ते त्यांची भूमिका मांडतात.

दरम्यान, टिकैत यांच्या भेटीपूर्वी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ''भारत-चीन सीमेवर सळ्या लावल्या असत्या तर चीन भारतात घुसला नसता. शेतकरी त्यांच्यासह आपल्यासाठीही आंदोलन करत असल्याने त्यांना पाठिंबा द्यायला हवा. आमचे हे कर्तव्य मानतो,'' असे ते म्हणाले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com