वाचा : उद्धव ठाकरेंशी राहुल गांधी नेमके काय बोलले?

महाराष्ट्रातील सरकारलाआम्ही केवळ पाठिंबा देणारे आहोत, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राहुल गांधी यांनी आज सकाळी चर्चा केली.
rahul gandhi speaks with chief minister uddhav thackeray
rahul gandhi speaks with chief minister uddhav thackeray

नवी दिल्ली : राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे दूरध्वनीवरुन आज सकाळी संभाषण झाले. कालच्या पत्रकार परिषदेत केलेल्या विधानामुळे निर्माण झालेल्या चर्चेबाबत दोन्ही नेत्यांने बोलणे झाले. राहुल गांधी यांनी त्यांचे विधान संबंध तोडून वापरण्यात आल्याचे सांगितले. याचबरोबर काँग्रेसचा राज्यातील सरकारला पूर्णपणे पाठिंबा असल्याची ग्वाहीही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानामागील पार्श्वभूमीही समजावून सांगितली. कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्र किती महत्वाचे राज्य आहे आणि त्याला महत्व द्यायला हवे, याबाबत मी विधान केले होते, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारसोबत असून, सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी नमूद केले. याचबबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये आणि निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला समान स्थान दिले जाईल, अशी हमी राहुल गांधींना दिली. 


महाराष्ट्रातील सरकारबाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय असा प्रश्न  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानानंतर उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा झाली. 

देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात सरकार अपयशी झाल्याची टीका राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी त्यांना महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, काँग्रेस तेथे सत्तेत सहभागी आहे, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारला काँग्रेसचा केवळ पाठिंबा आहे. पक्ष तेथे सत्तेत सहभागी नाही. आम्ही सरकारला पाठिंबा देत असलो तरी तेथील महत्वाच्या निर्णयात आमचा काहीही सहभाग नाही. सध्याच्या आव्हानात्मक काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला पूर्णपणे मदत करण्याची आवश्यकता आहे. 

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आम्ही केवळ सरकारला पाठिंबा देणारे आहोत, असे विधान मंगळवारी केले होते. त्यांच्या या विधानामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असे त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी म्हटले होते. 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाकडून उद्या (ता.28) सोशल मीडियावर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही मोहिम चालविण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी दिली. लॉकडाउनमुळे हाल सुरू असलेल्या नागरिकांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माकन म्हणाले की, पक्षाचे  नेते आणि कार्यकर्ते उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत 'स्पीकअप' ही ऑनलाइन मोहीम सोशल मीडियावर चालवतील. देशभरात अडलेल्या सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोचविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. याचबरोबर मनरेगा अंतर्गत त्यांनी 200 दिवसांचा रोजगार देण्यात यावा आणि त्यांनी तातडीने 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. तसेच, छोट्या व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज देण्यात यावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com