प्रशांत किशोर यांचा नीतिश कुमारांवर हल्लाबोल 

कोरोना संक्रमणाच्या काळात घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर विरोधी पक्षांकडून टिकेची झोड उठवली जात आहे. त्यात आता संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) माजी उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांचीही भर पडली आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात एकदाही घराबाहेर न आल्याबद्दल मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
 Prashant Kishor criticizes Nitish Kumar
Prashant Kishor criticizes Nitish Kumar

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी तापू लागले आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर विरोधी पक्षांकडून टिकेची झोड उठवली जात आहे. त्यात आता संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) माजी उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांचीही भर पडली आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात एकदाही घराबाहेर न आल्याबद्दल मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

प्रशांत किशोर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, "देशात सर्वात कमी कोरोनाच्या चाचण्या, रुग्णांचा 7.9 टक्के पॉझिटिव्ह दर, सहा हजारांपेक्षा जादा रुग्ण असे असूनही बिहारमध्ये चर्चा विधानसभा निवडणुकीची होत आहे. कोरोनामुळे गेली तीन महिने घराबाहेर न पडणाऱ्या नीतिश कुमार यांना असे वाटते आहे की, जनतेने घराबाहेर पडून मतदानात भाग घेण्यात कोणताही धोका नाही.' 

विरोध पक्षनेते तेजस्वी यांच्यासह संपूर्ण यादव कुटुंबाकडून याच मुद्यावरून नीतिश कुमार यांच्यावर हल्ला करण्यात येत आहे. तेजस्वी यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की,"आता संपूर्ण विरोधी पक्षांना एकत्र येऊन एक अणे मार्गावर जाऊन मुख्यमंत्री कुठे आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. बिहारमध्ये हाहाकार उडाला आहे, लोक मरत आहेत आणि मुख्यमंत्री 90 दिवसांपासून गायब आहेत. ते कुठच्या बिळात जाऊन लपले आहेत, हे त्यांनी जरा सांगावे.' तेजस्वी यांच्याबरोबरच राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव हेही सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर याच मुद्यावरून टिकेची झोड उठवत आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर घराबाहेर न पडण्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुशील मोदी पुढे आले आहेत. ते म्हणतात की "बिहारच्या मुख्यमंत्री निवासस्थानात गुन्हेगार लपण्याचे दिवस आता संपले आहेत. गुन्हेगारांना त्या ठिकाणी आश्रय दिला जात होता. रंगारंग कार्यक्रम चालत होते. ते दिवस आता गेले आहेत. हे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे सुशासन आहे. ते कोणत्या गुन्हेगाराला वाचवत नाहीत, ना कोणाला फसवत नाहीत.' 

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनीही मुख्यमंत्री नीतिश कुमार यांची पाठराखण केली आहे. त्यात त्यांनी झारखंड, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली या राज्यापेक्षा बिहारची परिस्थिती चांगली असल्याचा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com