राम मंदिर भूमिपूजन पुढे ढकलण्याची मागणी; गोखलेंना पोलिस संरक्षण 

अयोध्येतीलराम मंदिराच्या पाच ऑगस्टच्या प्रस्तावित भूमिपूजनाला परवानगी देऊ नये, यासाठी अहलाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे पत्रकार साकेत गोखले यांच्या ठाणे येथील घरासमोर घोषणबाजी करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच, गोखले यांना पोलिस संरक्षण देण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
Demand to postpone Ram temple bhumi pujan; Police protection for Gokhale
Demand to postpone Ram temple bhumi pujan; Police protection for Gokhale

पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या पाच ऑगस्टच्या प्रस्तावित भूमिपूजनाला परवानगी देऊ नये, यासाठी अहलाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे पत्रकार साकेत गोखले यांच्या ठाणे येथील घरासमोर घोषणबाजी करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच, गोखले यांना पोलिस संरक्षण देण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

आपल्या घरासमारे येऊन जय श्रीरामच्या घोषणा देण्यात येत आहेत. माझ्या कुटुंबीयांना त्यांच्यापासून धोका असल्याचे ट्विट गोखले यांनी केल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने तातडीने दखल घेत त्यांना पोलिस संरक्षण पुरविण्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी संबंधित आयटी कंपनीला निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम दिल्याची बातमी आजच (ता. २४ जुलै) समोर आली. ‘सरकारनामा’ने आज याचे सविस्तर वृत्त दिल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली.

लगेचच अहलाबाद न्यायालयात गोखले यांनी केलेल्या याचिकेची माहिती समोर आल्याने सोशल मीडियावरदेखील गोखले यांच्या विरोधात सूर उमटू लागला आहे. काहींनी त्यांच्या ठाण्यातील घरासमोर जाऊन घोषणाबाजी केली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने संरक्षण पुरविण्याची तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

राम मंदिराचे भूमिपूजन येत्या पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला किमान तीनशे लोक एकत्र येणार असून कोरोनाच्या अनलॉक गाइडलाइन्सचे या कार्यक्रमामुळे उल्लंघन होत असल्याचे गोखले यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला अडथळा आणल्याची भूमिका घेतल्याने गोखले यांच्याविरोधात सोशल मीडियावर असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील लोकांचे आपल्याला फोन येत आहे, असे ट्विटदेखील काही तासांपूर्वी पत्रकार साकेत गोखले यांनी केले आहे. 

राम मंदिर भूमिपूजनाच्या विषयात कॉंग्रेस पक्षाकडून राजकारण करण्यात येत आहे. त्यात साकेत गोखले यांना पुढे करण्यात येत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. त्यामुळे गोखले यांच्याबरोबरच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात येत आहे.

राम मंदिर भूमिपूजन सर्व कायदेशीर प्रकिया पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विरोध करण्याची भूमिका चुकीची असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com