नितीन गडकरींनी फोन केला अन् जगन मोहन महाराष्ट्रासाठी आले धावून...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेश सरकारकडून 300 व्हेंटिलेटर मिळवले आहेत.
corona update Andra Pradesh Govt has sent 300 ventilators to the maharashtra
corona update Andra Pradesh Govt has sent 300 ventilators to the maharashtra

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरूच असून रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. रुग्णांना अॅाक्सीजन बेडसाठी धावपळ करावी लागत असून व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक हजार व्हेंटिलेटर देण्याचे मान्य केले आहे. 

महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याने बेड अपुरे पडू लागले आहेत. व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धावून आले आहेत. त्यांनी एका फोनवर आंध्र प्रदेश सरकारकडून 300 व्हेंटिलेटर मिळवले आहेत. 

गडकरी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना फोन केला होता. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सहकार्य करावे, ही विनंती त्यांना केली. या विनंतीला मान देत त्यांनी लगेच 300 व्हेंटिलेटर महाराष्ट्राला पाठविले आहेत. या गंभीर परिस्थितीत लोकांचे जीव वाचविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. राज्यातील नागरिकांच्यावतीने मी त्यांचे आभार मानतो, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे. 

गडकरी यांनी सीएसआर फंडच्या माध्यमातून बीपीएपी व्हेंटीलेटरही मागविले आहेत. नागपुरसह विदर्भातील मेळघाटसारख्या दुर्गम भागातील लोकांचा जीव वाचविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तसेच विशाखापट्टणम येथील आरआयएनएन कंपनीतून महाराष्ट्राला दररोज 97 मेट्रिक टन लिक्विड अॅाक्सीजन मिळण्यासाठीही गडकरी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यापूर्वी भिलाईहून 60 टन अॅाक्सीजन मिळत आहे. आता दररोज 157 मेट्रिन टन अॅाक्सीजन मिळणार असल्याची माहिती गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

कोरोना पोहचला जगातील सर्वात उंच शिखरावर

मागील वर्षभरापासून कोरोनाने जगातील बहुतेक सर्वच देशांना विळखा घातला आहे. सध्या जगात सर्वाधिक रुग्ण भारतात आढळून येत आहेत. सध्या दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णसंख्या समोर येत असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जगातील प्रत्येकी चार रुग्णांमागे भारतातील एक रुग्ण असल्याची स्थिती आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असले तरी अद्याप कोरोना विषाणू जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहचला नव्हता. पण या विषाणुने आता हे शिखरही सर केल्याचे स्पष्ट झाले. एका गिर्यारोहकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याला शिखराच्या बेस कँपवरून तातडीने हेलिकॅाप्टरद्वारे काठमांडूला हलविण्यात आले. 

बाधित गिर्यारोहक एर्लंड नेस हा नॅार्वे या देशातील आहे. त्याची कोरोना चाचणी 15 एप्रिल रोजी पॅाझिटिव्ह आली होती. तर गुरूवारी त्याची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या तो नेपाळमधील एका कुटूंबासोबत राहत आहे. पण एक गिर्यारोहक कोरोनाबाधित झाल्याने इतर गिर्यारोहक, गाईड व इतर सहकाऱ्यांमध्ये भिती पसरली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com