अमित शहांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली 

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांकडे भेटीसाठीची मागणी केली होती. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारली.
Amit Shah jpg
Amit Shah jpg

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या कर्नाटक दौर्यावर आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह बेळगाव दौरा करत असल्याची माहिती आहे. मात्र या दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अमित शाहांच्या भेटीची मागणी केली होती. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारली.  

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांकडे भेटीसाठीची मागणी केली होती. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारली.

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 17 जानेवारीला हुतात्मा दिन पाळला जातो. या पार्श्वभूमीवर  १६ जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांची भेट मागितली होती. ही भेट महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून मागितली होती.

सीमाभागात होत असलेल्या अन्यायाची माहिती गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेपर्यंत बेळगावात जैसे थे परिस्थिती राहावी, या मागणी साठी महाराष्ट्र एकीकरण समिती च्या शिष्टमंडळाने भेट मागितली होती. मात्र, अमित शहा यांनी भेटण्यास नकार दिला. 

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह बेळगाव दौरा करत आहेत. या ठिकाणी जनसेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अमित शाह यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमाला दोन लाखांहून अधिक कार्यकर्ते सहभागी असतील, अशी माहिती आहे.

या कार्यक्रमासाठी बेळगावच्या जिल्हा क्रिडांगणावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी एक लाखांहून अधिक लोकांच्या बसण्याची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com