जायकवाडीचे पाणी वाण धरणात आणणे हेच आपले ध्येय : धनंजय मुंडे

वाण धरण भरल्याने परळी व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे. मात्रभविष्यात दुष्काळामुळे वाण धरण कोरडे पडल्यास परळी शहराला पाणी टंचाई भासू नये यासाठी नाथरा फाटा येथून जाणाऱ्या माजलगाव कालव्याला पाईपलाईन करून जायकवाडी चे पाणी वाण धरणात आणणे हा आपला प्रयत्न आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले
Dhanjay Munde performing Pooja at Wan Dam
Dhanjay Munde performing Pooja at Wan Dam

परळी : परळी शहरासह तालुक्याची जलसंजीवणी असलेले वाण धरण चार वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे तालुक्याची तहान भागणार असून सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने समाधान वाटत आहे.  माजलगाव कालव्याला पाईपलाईन करून जायकवाडी चे पाणी वाण धरणात आणणे आपले ध्येय असल्याचे परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

परळीजवळील वाण धरणाच्या तीरावर श्री. मुंडेंच्या हस्ते शनिवारी विधिवत जलपूजन संपन्न झाले. आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, अभय मुंडे, दीपक देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, शरद मुंडे, भाऊ कराड, मोहन सोळंके, सूर्यभान मुंडे, उपसभापती पिंटू मुंडे, प्रशांत जगताप, रवी मुळे, विनोद जगतकर, वैजनाथ बागवाले, नाथ प्रतिष्ठानचे नितीन कुलकर्णी, तहसीलदार विपीन पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, जलसंपदा विभागाचे अभियंता श्री. सिरसाट, श्री. गुळभिले आदींची उपस्थिती होती. 

श्री. मुंडे म्हणाले, ''यावर्षी वाण धरण भरल्याने परळी व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  संपला आहे. मात्र भविष्यात  दुष्काळामुळे वाण धरण कोरडे पडल्यास परळी शहराला पाणी टंचाई भासू नये यासाठी नाथरा फाटा येथून जाणाऱ्या माजलगाव कालव्याला पाईपलाईन करून जायकवाडी चे पाणी वाण धरणात आणणे हा आपला प्रयत्न आहे. यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत नुकतीच एक बैठक घेतली आहे.'' वाण धरणासाठी जायकवाडी चे पाणी आरक्षित करण्यात यावे याबाबतही आपण मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास परळीचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com