खडसेंचा वापर फडणवीसांवर आरोपांसाठी झाला तर ते दुर्दैव - रावसाहेब दानवे

एकनाथ खडसे हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीने त्यांचा उपयोग त्यासाठी करुन घ्यायला हवा. मात्र, केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांसाठी त्यांचा उपयोग केला गेला, तर त्यासारखे दुर्दैव नाही,'' असे प्रतिपादन भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे केले.
Raosaheb Danve - Ekanath Khadse
Raosaheb Danve - Ekanath Khadse

जालना : ''एकनाथ खडसे हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीने त्यांचा उपयोग त्यासाठी करुन घ्यायला हवा. मात्र, केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांसाठी त्यांचा उपयोग केला गेला, तर त्यासारखे दुर्दैव नाही,'' असे प्रतिपादन भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे केले. 

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या अनुषंगाने दानवे बोलत होते. ते म्हणाले, ''खडसेंना थांबवायचे, समजवायचे भाजप नेतृत्त्वाने प्रयत्न केले. पण नाथाभाऊंची नाराजी आम्ही दूर करु शकलो नाही. त्यांची नाराजी काय होती, त्यांना काय म्हणायचं होतं ते तुम्ही नेतृत्त्वाकडे पक्षाच्या व्यासपीठावर मांडा असे सांगितले होते. ते पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले. अमित शहांना भेटले. पक्षाने त्यांचे ऐकले नाही, असे काही नाही. पण तरीही त्यांची नाराजी दूर होऊ शकले नाही. त्यातून ते आज राष्ट्रवादीत चालले. त्यांनी पक्षातून जायला नको होते. काँग्रेस - राष्ट्रवादी त्यांचा कसा वापर करुन घेतात हे माहित नाही. खडसेंकडे अनुभव आहे. विकासाबाबत भूमीका आहे. त्याचा उपयोग काँग्रेस-राष्ट्रवादीने करुन घेतला पाहिजे,''

''नाथाभाऊंचा वापर केवळ भाजप व फडणवीसांवर आरोप करण्यासाठी करुन घेतला तर त्यासारखे दुर्दैव नाही, असे मला वाटते. छोटा कार्यकर्ता गेला तरी दुःख होते. हे तर नाथाभाऊ आहेत. पोकळी निर्माण होणार. पण भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. खडसे गेले तरी त्यांच्याबरोबर जिल्ह्यातले सारे कार्यकर्ते जातील असे नाही. ही पोकळी निर्माण झाली ती कार्यकर्त्यांच्या जीवावर भरुन काढू. एकेकाळी भाजपचे केवळ दोन खासदार होते. पण आम्ही तोच पक्ष आम्ही उभा केला. आज अठरा राज्यात आणि देशात आमची सत्ता आहे. ही शक्ती आम्ही उभी केली, '' असेही दानवे म्हणाले.

एकनाथ खडसेंवर अंजली दमानियांनी कशासाठी आरोप केले हे मला माहित नाही, असे सांगत दानवे यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com