...तर कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका ना ; पालकमंत्री नवाब मलिक भडकले

महावितरणचे ठेकेदार नीट काम करत नसतील व त्यामुळे शेतकऱ्यांपुढे अडचणी येत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाका, अशा सूचना परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी काल घेतलेल्या बैठकीत केल्या
Parbhani Guardian Minister Nawab Malik Became Angry over Electricity Supply
Parbhani Guardian Minister Nawab Malik Became Angry over Electricity Supply

परभणी : शेतातील वीज रोहित्र वारंवार जळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जर कंत्राटदार काम करत नसतील तर अश्या कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकत नाहीत असा प्रश्न उपस्थित करून पालकमंत्री नवाब मलिक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्ह्याचे खासदार संजय जाधव, आमदार  डॉ.राहुल पाटील यांनी गुरुवारी या संदर्भात पालकमंत्र्यांच्या बैठकीत तक्रार केली होती.

परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी (दि. ३०) जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. पालकमंत्री नवाब मलिक महाराष्ट्र दिनानिमित्य ध्वजारोहणासाठी गुरुवारी सायंकाळी परभणी शहरात आले होते. यावेळी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकास कामे व खरीब हंगाम या बाबींचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी ही बैठक बोलविली होती. या बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर -साकोरे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी केल्या विविध सूचना

पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा करण्यात यावा. बियाणे व खतांचा तुटवडा होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी. अनुदानावर वाटप करण्यात येणाऱ्या बियाणे  शेतकरी व लाभार्थ्यांना कसा लाभ होईल, याची काळजी घ्यावी असे सूचविले. जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन खरीप पीककर्ज वाटपा संदर्भात जास्तीत जास्त ठिकाणी मेळे घ्यावेत. तसेच वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून याची प्रसिद्धी करावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात यावा, अश्या सुचना केल्या. 

महावितरणबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल

खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तसेच कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी महावितरणच्या तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेतली शेतकर्‍यांचे रोहित्र जळण्याचे मोठे प्रमाण आहे. संबंधीत ठेकेदार वेळेवर काम करीत नसतील तर शेतकऱ्यांना अडचणीस सामोरे जावे लागेल. यामुळे संबंधीत ठेकेदार कामात कसूर करीत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com