शिक्षकांच्या ऑफलाइन बदल्यांचा घाट कुणासाठी : पंकजा मुंडे 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. सरकार सर्व व्यवहार ऑनलाइन करत असताना शिक्षकांच्या बदल्याच ऑफलाइन का, असा सवाल माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. सरकारला जाब विचारण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Offline transfer of teachers for whom: Pankaja Munde :
Offline transfer of teachers for whom: Pankaja Munde :

बीड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद आहेत. सरकारही सर्व व्यवहार ऑनलाइन करत आहे. मग, शिक्षकांच्या बदल्याच ऑफलाइन का? हा घाट कुणासाठी घातला जातोय, असा सवाल करत हा निर्णय म्हणजे खाली डोकं वर पाय असल्याची टीका माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर केली. याचा जाब विचारण्यासाठी तयार राहा, असे आवाहनही त्यांनी केले. 

पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. २४ जुलै) मराठवाड्यातील शिक्षकांसह लोकप्रतिनिधींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या मध्यमातून संवाद साधला. माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार सुरेश धस, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार सूजितसिंह ठाकूर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार संतोष दानवे, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, देविदास राठोड तसेच संयोजक रमेश पोकळे सहभागी होते. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, शिक्षक हे लाभाचं पद नाही, भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे त्यांना मनासारख्या नेमणुका मिळाव्यात. यासाठी राज्याचे रोस्टर करण्याची गरज आहे. दुर्गम भागाची व्याख्या व्हायला हवी, तसेच दिव्यांगांचे प्रमाणपत्रही तपासावे. आमच्या सरकारने घेतलेल्या ऑनलाइन बदल्यांच्या निर्णयामुळे अनेकांना न्याय मिळाला व पादर्शक बदल्या झाल्या. परंतु, या सरकारने हा घेतलेला निर्णय हास्यास्पद असून ‘खाली डोकं वर पाय’ असा असल्याचेही मुंडे म्हणाल्या. 

बदल्या ह्या ऑनलाइन पद्धतीनेच कराव्यात, या शिक्षकांच्या मागणीसाठी आपण आग्रही आहोत. माझे आजोबा तसेच मामा प्रमोद महाजन हे स्वतः शिक्षक होते आणि गुरू म्हणून माझे पिता मुंडे साहेब हेही याच वातावरणात वाढले, त्यामुळे या लढाईत मी तुमच्यासोबत आहे. मी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना निवेदन दिली आहेत. सरकारने बैठक बोलवावी, हा प्रश्न तत्काळ निकाली काढावा; अन्यथा हा निर्णय बदलण्यासाठी आम्हाला सरकारला भाग पाडावे लागेल, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. 

दरम्यान, या संवादात विकास गवते, मंगेश जैवाल, सुरेखा खेडकर, राहुल उंडाळे, श्रीराम बोचरे, शेख जलील, राजेंद्र लाड, अशोक बांगर, धसे, प्रताप देशमुख, अजित मगर, पुरूषोत्तम काळे, मदन मुंडे आदीसह सुमारे दीडशेहून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला.

या सर्वानी सरकारच्या ऑफलाइन बदली धोरणाला विरोध केला. हा निर्णय आर्थिक लभासाठी घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला. या लढ्यात आम्ही पंकजा मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com