तुम्ही राजकीय बोलाल तर राजकीय प्रत्युत्तर देईन : फडणवीसांचा आघाडीला इशारा - Devendra Fadanavis Warns MahavikasAghadi Government | Politics Marathi News - Sarkarnama

तुम्ही राजकीय बोलाल तर राजकीय प्रत्युत्तर देईन : फडणवीसांचा आघाडीला इशारा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

फडणवीस आज पूरस्थिती पाहणीच्या दौऱ्यावर आहेत. दौरा सुरु करण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्यावर्षी अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या  वेळी केलेल्या मागण्याचे व्हिडिओ दाखवून  फडणवीसांनी 'लाव रे तो व्हिडिओ'चा प्रयोग करत महाविकास आघाडीवर टीका केली. 

उस्मानाबाद : ''सरकारचे कामकाज When There in No will there is Survay, असे आहे. सरकारने फक्त पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मदत करायला हवी. सत्तेतलेच लोक राजकीय बोलताहेत. ते योग्य नाही. संवेदनशीलता दाखवली पाहिजे. तुम्ही राजकीय बोलणार असाल तर मी राजकीयच बोलेन,'' असा इशारा माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.

फडणवीस आज पूरस्थिती पाहणीच्या दौऱ्यावर आहेत. दौरा सुरु करण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्यावर्षी अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या  वेळी केलेल्या मागण्याचे व्हिडिओ दाखवून  फडणवीसांनी 'लाव रे तो व्हिडिओ'चा प्रयोग करत महाविकास आघाडीवर टीका केली. 

आताचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तेव्हा काय बोलले होते, ते पूर्ण करण्याची त्यांच्यासमोर संधी आहे असे सांगून फडणवीस म्हणाले, "मागील सरकारच्या काळातील वक्तव्य १० हजार कोटींची मदत आम्ही जाहीर केली होती मात्र यांनी कोणतीच मदत जाहीर केली नाही. त्यावेळी मी काळजीवाहू मुख्यमंत्री होते. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आम्ही मदत जाहीर केली होती. त्यावेळी त्यांनी किमान २५ हजार कोटींच्या मदतीची मागणी केली होती. आता त्यांनी ही मदत जाहीर करावी,''

दौऱ्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, "प्रचंड वृष्टी झाली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ज्यांची पिके कापणीला आली किंवा ज्यांनी कापून ठेवली अशा दोघांचेही नुकसान झाले. मी पुणे सोलापूर, उस्मानाबाद प्रवास केला. बारामतीतील उंडवडीपासून सुरुवात केली. सरासरीपेक्षा जास्त पाऊस मराठवाड्यामध्ये झाला. मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात २०० टक्क्यां पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दौंड तालुक्यांतील मळद गावात गेले ८ दिवस वीज नाही. प्रशासन ही पोहचले नाही, अशी स्थिती आहे,"

''विमा कंपन्यांवर सरकारने दबाव आणून शेतकऱ्यांला विमा मिळवून दिला पाहीजे. ज्या ठिकाणी पंचनामे करता येणार नाही त्या ठिकाणी मोबाईल वरील फोटोच्या माध्यमातून देखील पंचनामा ग्राह्य धरला पाहीजे.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. सरकारमध्ये इच्छाशक्ती असेल तर तिचा वापर करुन सरकार मदत करु शकते. केवळ घोषणांनी कुणाचेही समाधान होणार नाही,'' असेही फडणवीस म्हणाले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख