दिवाळीनंतर ९ वी पासूनचे वर्ग सुरु करण्याचा विचार - बच्चू कडू

रोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन मध्ये आता राज्यात अनलॉक सुरू आहे. जवळपास सर्व बाबी या खुल्या करण्यात आल्या असल्या तरी मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.हे टाळण्यासाठी दिवाळी नंतर राज्यातील ९ ते १२ पर्यत शाळा सुरू करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले
Bacchu Kadu
Bacchu Kadu

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शासकीय खाजगी शाळा महाविद्यालय अद्यापही बंद आहे. परंतु दिवाळी नंतर राज्यातील वर्ग ९ ते १२ वी पर्यत शाळा सुरू करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्री बच्चू यांनी दिली. 

कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले जाणार आहे असेही शिक्षण राज्यमंत्री बच्चू म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन मध्ये आता राज्यात अनलॉक सुरू आहे. जवळपास सर्व बाबी या खुल्या करण्यात आल्या असल्या तरी मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.हे टाळण्यासाठी दिवाळी नंतर राज्यातील ९ ते १२ पर्यत शाळा सुरू करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

या शाळा सुरु करत असताना सरकारच्या वतीने एक चांगल धोरण आखण्यात येईल.या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनाने बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिल्या जाईल अशा प्रकारची भूमिका ही सरकार ची आहे. जर एखाद्या शिक्षकाचे वय ५० च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दुसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का, तसेच बाधित मुलं शाळेत येऊ नये या साठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का असाही विचार सुरू असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com